अक्षरांचा अनहद नाद व निर्गुणी भजने यांच्या मिलाफातून स्वरांची प्रयोगशील अनुभूती
अक्षरांचा अनहद नाद व निर्गुणी भजने यांच्या मिलाफातून स्वरांची प्रयोगशील अनुभूती
नाशिक (प्रतिनिधी) :
सुर,स्वर ,नाद आणि सुले खनाची अनोखी अनुभूती यांच्या
मिलाफातून संगीत रचनांचा अस्सल आविष्कार रसिकांना अनु भवायला मिळाला.निर्गुणी भजना तून जगण्यातली अस्तित्वाची खोलवर जाणीव अधोरेखित झाली.गायक प्रितम नाकील यांचे कुमार गंधर्व यांच्या बंदिशींचे गायन ,जागतिक किर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी
अक्षरातून स्वरांचा नाद रसिकांसमोर मांडला. दृष्यानुभव दिला तर निलेश गायधनी यांनी नेटक्या संहिता लेखन व निवेदनातून कुमारजींच्या गायन साधनेचे ,प्रयोगशीलता यांचं दर्शन घडविले.
ख्यातनाम गायक स्व. पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पं. कुमार गंधर्व यांच्या गायकीचे दर्शन घडवणार्या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सूर गंधर्व’ या शीर्षकाने . झालेला हा कार्यक्रम ऋचिता विश्वास ठाकूर आणि अबीर क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
पं. कुमार गंधर्व यांची निर्गुणी भजने गायक प्रितम नाकील सादर केली त्यांना तबला साथ रसिक कुलकर्णी, संवादिनी ऋषिकेश कुलकर्णी यांनी केली जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी सुलेखनाचा आविष्कार पेश केला. राजा अब तो आजारे, बचाओ मेरी मा मातारी,मेरे आऊ तोरे मदरवा, करन दे रे कछु ललारे,उड जायेगा हंस अकेला, सूनता है गुरू ग्यानी आदी बंदिशी सादर केल्या.
या कार्यक्रमाची संकल्पना व संहितालेखन निलेश गायधनी यांची संयोजक पुजा निलेश होत्या.
विश्वास ग्रुप चे कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर म्हणाले की, कलेच्या माध्यमातून जीवनाचा आनंद अधिकाधिक सुखकर व्हावा तसेच नव्या पिढीतील कलाकारांचा आविष्कार रसिकांसमोर यावा यासाठी विश्वास ग्रुप ने व्यासपीठ निर्माण केले आहे.त्यात सर्वांनी सहभागी व्हावे.
डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब, सावरकरनगर, गंगापूर रोड, येथे कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर, अबीर क्रिएशन्स, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी आर्कि.संजय पाटील,विनायक रानडे, डी जे हंस वाणी,कविता गायधनी ,अतुल भालेराव,अभय ओझरकर,सुहास भोसले आदी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.