संपतराव बोरकर यांचे दुःखद निधन
संपतराव बोरकर यांचे दुःखद निधन
संगमनेर ( प्रतिनिधी )
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे माजी रजिस्टार तसेच जोर्वे येथील सामाजिक कार्यकर्ते संपतराव बोरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे मृत्यू समय त्यांचे वय 71 वर्षे होते.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपतराव बोरकर यांनी अमृतवाहिनी शेती शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये मोठे योगदान दिले अनेक वर्ष त्यांनी संस्थेचे रजिस्टार पद अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळले याचबरोबर सातत्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना मदत केली.
Advertisement
सेवानिवृत्तीनंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जोरवे व परिसरातील सामाजिक कार्यात सातत्याने सहभाग घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगा भारत कॅप्टन दौलत तीन भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात,सौ.दुर्गाताई तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात, सौ.शरयू ताई देशमुख, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्हि.बी.धुमाळ, डॉ.जे. बी.गुरव,डॉ.एम.ए.व्यंकटेश यांच्यासह अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील सर्व प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व जोर्वे ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.



