नासिक येथील नामांकित हॉस्पिटल मध्ये रिसेप्शनिष्ट निघाली ठग बहाद्दर डॉक्टरांना लावला 3 लाखाचा चुना
नासिक येथील नामांकित हॉस्पिटल मध्ये रिसेप्शनिष्ट निघाली ठग बहाद्दर
डॉक्टरांना लावला 3 लाखाचा चुना
नासिक प्रतिनिधी:
नाशिक येथील कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांकडे रिसेप्शनिस्ट असलेल्या युवतीने रुग्णांकडून स्वीकारलेल्या शुल्कात हेराफेरी करीत तब्बल तीन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत माहिती अशी की, कॅनडा कॉर्नर येथील रामदास कॉलनीत डॉ. सुधीर शेतकर (रा. नाशिक) यांचे इंम्पल्स अॅडव्हान्स हार्ट केअर सेंटर आहे.
याठिकाणी रिसेप्शनिस्ट म्हणून त्यांच्याकडे योगिता खाडे (रा. सिन्नर) ही तरुणी २०२२ पासून नोकरीला होती. दरम्यान, जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधी दरम्यान तिने डॉ. शेतकर यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या विविध रुग्ण, त्यांच्या नातलगांकडून तपासणी सल्ला तसेच रिपोर्टची फी आकारण्याचे काम केले.
ते करीत असतानाच तिने सदरची रक्कम रोख स्वरुपात घेतले आणि रेकॉर्डवरील पावत्यांमध्ये रुग्णांच्या नावापुढे स्वत:च्या हस्ताक्षरात विविध रकमा ऑनलाइन पद्धतीनेच जमा झाल्याचे दाखविले. या माध्यमातून संशयित युवतीने तब्बल ३ लाख ४ हजार ५५१ रुपयांचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.