अण्णाभाऊ साठे यांचे कार्य उल्लेखनीय – राजू कांबळे
अण्णाभाऊ साठे यांचे कार्य उल्लेखनीय
राजू कांबळे
सिन्नर (प्रतिनिधि)
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी, थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी कामगार, कष्टकरी व शोषितांसाठी लढा उभारला. आपल्या लेखणीतून वास्तव प्रश्नांना वाचा फोडली.महाराष्ट्रासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे असे मत क्रांतीगुरू सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे यांनी व्यक्त केले.
येथील वावी वेस भागात थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
संघटनेच्या वतीने साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विरेंद्र अस्वरे याने अण्णाभाऊंच्या जीवनकार्य याविषयी माहिती दिली.
यावेळी विजय दोडके, योगेश जाधव, मा. सरपंच मधुकर गोळेसर, प्रसाद दोडके, संतोष भालेराव,बाळासाहेब कासारे, काळूराम देडे, गणेश अस्वले, नंदू साळवे, अमोल आव्हाड, रविंद्र साळवे, समाधान अस्वले, संजय शेलार,बाळासाहेब खुळे,प्रशांत दातरंगे, श्रेयस अस्वले, ऋत्विक दोडके, नवनाथ कांबळे आदींसह क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन चे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.