ताज्या घडामोडीसामाजिक

दानशूर व्यक्तींनी स्वतःहून पुढे येऊन, अध्यात्मिक कार्य करणाऱ्या मंडळांना सहकार्य करावे- मुकुंद काकड


*दानशूर व्यक्तींनी स्वतःहून पुढे येऊन, अध्यात्मिक कार्य करणाऱ्या मंडळांना सहकार्य करावे – मुकुंद काकड*

*सिन्नर येथील भजनी मंडळास भजन साहित्य भेट* 

*जनसेवा सेवाभावी संस्थेचे आषाढी एकादशी निमित्त स्तुत्य उपक्रम*

सिन्नर प्रतिनिधी

सिन्नर येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळाला आषाढी एकादशी निमित्ताने जनसेवा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वारकऱ्यांना भजनाचे साहित्य पखवाद, विना भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष व नासिक जिल्हा उपाध्यक्ष जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काकड यांच्या आर्थिक मदतीतून साहित्य भेट करण्यात आली. सिन्नर ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या सदस्यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी वारकऱ्यांविषयी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनी दानशूर व्यक्तींनी स्वतःहून पुढे येऊन, अध्यात्मिक कार्य करणाऱ्या मंडळांना सहकार्य करावे, आमची संस्था नेहमी गरजवंतांना मदत करत असते.. जनसेवा संस्थेच्या वतीने कायमच गोरगरिबांना मदत केली जाते. पालकांनी आपल्या मुलांना अध्यात्मिक शिक्षण देऊन आपल्या वारकरी संप्रदायाचे नाव उज्वल करावे, आपल्या हिंदू धर्माची जनजागृती करा असे मुकुंद काकड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सिन्नर ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे सदस्य, ह.भ. प. डॉ.विनायक सूर्यवंशी बाबा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ठाणगाव जनसेवा सेवाभावी संस्थेने आम्हाला आषाढी एकादशी निमित्ताने भजनाचे साहित्य भेट दिल्याबद्दल आभार मानले. भजनाचे साहित्य भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या हस्ते करण्यात आले आले.

Advertisement

 

प्रकाश गंगाधरे, भारतीय जनता पार्टी युवा नेते मुंबई , भारतीय जनता पार्टी सरचिटणीस रामदास भोर, इंजिनीयर, रामसिंग परदेशी , ठाणगावचे उपसरपंच विलास मोरे, इंजिनिअर अक्षय घुगे, जनसेवेचे उपाध्यक्ष वसंत आव्हाड, प्रतीक शिंदे, इंजिनीयर सुनील आंधळे , जगन केदार, विशाल काकड, ह.भ. प. भागवत श्री सागर , ह. भ. प. डॉ. विनायक सूर्यवंशी , दगुजी गीते , श्रीरंग सूर्यवंशी , अथर्व सूर्यवंशी आदी वारकरी उपस्थित होते. कार्यक्रम सिन्नर येथील विठ्ठल मंदिर विजयनगर अहिल्याबाई होळकर वारकरी भवनांमध्ये पार पडला..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *