ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संगमनेर- राजापूर रस्त्याच्या कामाबाबत युवक काँग्रेसचे निवेदन संगमनेर राजापूर रस्त्याचे काम तातडीने सुरू करा- डॉ जयाताई थोरात ढोलेवाडीतील नागरिकांची मागणी


संगमनेर- राजापूर रस्त्याच्या कामाबाबत युवक काँग्रेसचे निवेदन

 

संगमनेर राजापूर रस्त्याचे काम तातडीने सुरू करा- डॉ जयाताई थोरात

 

ढोलेवाडीतील नागरिकांची मागणी

 

 

संगमनेर (प्रतिनिधी)

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक निधीतून संगमनेर अकोला नाका ते राजापूरकडे जाणारा बायपास पर्यंतचा एक किलोमीटरचा रस्ता हा मंजूर झाला असून तो खडी अभावी सुरू झाला नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे .म्हणून तातडीने रस्त्याचे काम सुरू करावे या मागणीचे निवेदन युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

 

प्रांताधिकारी कार्यालय येथे युवक काँग्रेसच्या वतीने अकोले नाका ते राजापूर रोड बायपास ढोलेवाडी परिसरातील रस्ता कामाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात, कारखान्याचे संचालक अभिजीत ढोले, सरपंच सौ शालिनीताई ढोले, राजेंद्र ढोले ,रामनाथ ढोले, सुधाकर ताजणे ,प्रियशा बुळकुंडे, शंकर ढोले, अमोल ढोले, निशा भरीतकर ,संगीता सूर्यवंशी ,सुरेखा दोरोळे ,सुनील मस्के ,वैशाली ढोले, पंकज शिंदे आदींसह ढोलेवाडीतील युवक काँग्रेसचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

 

या निवेदनात म्हटले आहे की, अकोले नाका ते नाशिक पुणे बायपास हा एक किलोमीटरचा रस्ता आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निधीतून मंजूर झाला असून तो निधी संबंधित यंत्रणेकडे वर्ग झाला आहे. त्याच निधीमधून गटारीचे काम झालेले आहे .मात्र रस्त्याचे काम खडी व इतर खनिजा अभावी बंद आहे. यामुळे या रस्त्याने येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, महाविद्यालय विद्यार्थी, दूध उत्पादक या सर्वांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी व चार चाकी वाहन चालवण्यासाठी हा रस्ता उपयुक्त राहिला नसून यामुळे छोट्या-मोठे अपघात होत आहे. तरी तातडीने हा रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी करण्यात आली आहे

 

यावेळी डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांकरता मोठा निधी उपलब्ध झाला असून फक्त खडी आणि गौण खनिजा अभावी अनेक कामे बंद आहेत तरी जनतेच्या विकासाकरता सरकारने व प्रशासनाने कोणतेही राजकारण न करता तातडीने सर्व कामे सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली

 

यावेळी ढोलेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *