ताज्या घडामोडी

नाशिक जिल्ह्यातील १५ जागांसाठी १५० मराठा समाज बांधव व जरांगे पाटील समर्थक इच्छुक मिशन विधानसभा : नाशिक जिल्ह्यातील विविध मतदार संघातील अहवाल घेऊन इच्छुकांची जरांगे पाटील यांची आंतरवली येथे भेट


नाशिक जिल्ह्यातील १५ जागांसाठी १५० मराठा समाज बांधव व जरांगे पाटील समर्थक इच्छुक

मिशन विधानसभा : नाशिक जिल्ह्यातील विविध मतदार संघातील अहवाल घेऊन इच्छुकांची जरांगे पाटील यांची आंतरवली येथे भेट

नाशिक : प्रतिनिधी

सरकारने सगेसोयरे अधिसूचना जारी करून ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर मराठा उमेदवार, निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केल्यानंतर आंतरवली सराटी येथे, राज्यभरातील इच्छुकांकडून अहवाल पाठविले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्वच १५ जागा लढविण्यास मराठा व आरक्षणाला पाठिंबा देणारे उत्सुक असून,या पंधराही जागांसाठी आतापर्यंत दीडशेपेक्षा अधिक इच्छुकांनी आपले अहवाल जरांगे-पाटील यांच्याकडे सादर केले आहेत.

Advertisement

जरांगे-पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप, मंगळवारी (दि.१३) नाशिक येथे शांतता रॅलीने करण्यात आला. यावेळी जरांगे-पाटील यांनी आगामी विधानसभा लढविण्याबाबत २९ ऑगस्ट रोजी निर्णय घेणार असल्याचे, स्पष्ट केले होते.तत्पूर्वी १४ ते २० ऑगस्ट दरम्यान इच्छुकांनी आपल्या कामांचा अहवाल, आंतरवली सराटी येथे पाठवावा,असे आवाहन केले होते.त्यानंतर जिल्ह्यातून इच्छुक मराठा तसेच राखीव मतदार संघातून मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या इच्छुकांकडून, अहवाल पाठविण्यास सुरुवात झाली आहे.आतापर्यंत प्रत्येक मतदार संघातून किमान दहा अहवाल पाठविण्यात आले आहेत.२०ऑगस्ट पर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.त्यामध्ये गेली नाशिक लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढलेले करण गायकर यांचाही समावेश असून,त्यांनी नाशिक पश्चिमसह येवला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.त्याव्यतिरिक्त नाशिकच्या शिवतीर्थ येथे शंभर दिवसांपेक्षा अधिक काळ साखळी उपोषण करणारे नाना बच्छाव यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे.यावेळी अंतरवली सराटी या ठिकाणी भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात, करण गायकर, विलास पांगारकर,नानासाहेब बच्छाव, आशिष हिरे,सुभाष गायकर,वैभव दळवी,राम निकम,संदीप खुटे,ज्ञानेश्वर सुरवसे,राम खुर्दळ,काका पवार, अण्णासाहेब खाडे,संदीप हांडगे,योगेश नाटकर,हर्षल खैरनार,श्रेयस बच्छाव, चंद्रकांत बच्छाव,बाळासाहेब बच्छाव, भास्कर झाल्टे,भिमराज लोखंडे,विशाल वडघुले आधी समाज बांधव उपस्थित होते.

 

कोट-

२९ ऑगस्टला निर्णय

आगामी विधानसभा निवडणूक लढायची की सत्ताधारी,विरोधकांचे उमेदवार पाडायचे याबाबतचा निर्णय २९ ऑगस्ट रोजी राज्यभरातील समाज बांधवांच्या उपस्थितीत मनोज जरांगे-पाटील घेणार आहेत. यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांना आंतरवली सराटी येथे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.दरम्यान,२९ ऑगस्टला नाशिकमधून प्रत्येक गावातू किमान एक गाडी अशा मोठ्या प्रमाणत मराठा बांधव आंतरवली सराटी येथे जाणार आहे.त्या संदर्भात नाशिक जिल्ह्याची अंतिम तयारी सुरू आहे.

-करण गायकर,मराठा क्रांती मोर्चा,राज्य समन्वयक

नाशिक : आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून अहवाल सादर करताना विलास पांगरकर करण गायकर नाना बच्छाव आशिष हिरे जिल्ह्यातील विविध मतदार संघातील इच्छुक.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *