मुळाचे ओव्हर फ्लोचे पाणी डाव्या व उजव्या कॅनॉलला सोडा*-सुरेशराव लांबे पाटील.
*मुळाचे ओव्हर फ्लोचे पाणी डाव्या व उजव्या कॅनॉलला सोडा*-सुरेशराव लांबे पाटील.
म्हैसगांव प्रतिनिधी-
पावसाळा सुरु होऊन दो महीने उलटुन गेली परंतु मुळा धरण कार्यक्षेत्रातील ऊजवा व डावा कॅनल कार्यक्षेत्रा सुरवातीला पेरणी योग्य पाऊस झाला परंतु त्यानंतर काही भागात तुरळक पावसाच्या सरी आल्या त्याने पिके फक्त हिरवी राहीली तर अनेक भागात पाऊस थांबल्याने पिके जळुन चालली आहेत,चालु वर्षी मुळा पाणलोट क्षेत्रात समाधान कारक पाऊस झाल्याने धरण 15 ऑगस्ट पुर्वीच 23 टियमसी पर्यत भरले असुन ओहर फ्लोचे पाणी नदीला सोडन्याची वेळ आली असताना ते पाणी आधी मुळा ऊजवा व डावा कॅनाॅलला सोडन्याची गरज असताना ते पाणी मुळा धरण कार्यक्षेत्रातील राहुरी,नेवासा,शेवगाव-पाथर्डी चे आजी माजी आमदार व पालकमंत्री यांच्या दुर्लक्षामुळे जलसंपदा विभागाच्या अभियंता सायली पाटील यांच्या शुभ हस्ते मुळा नदी पात्रात पाणी सोडन्यात आले,पाण्या अभावी शेतक-यांची हाता तोंडाशी आलेली पिके जळुण चालली आहेत,आधी मुळा ऊजवा व डावा कॅनाॅलला पुर्ण क्षमतेने पाणी सोडा ऊर्वरीत ओहरफ्लोचे पाणी नदीपात्रात सोडा अंन्यथा आम्हाला शेतक-यांना बरोबर घेऊन आंदोलन छेडावे लागेल असा ईशारा प्रहारचे राहुरी तालुकाध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला,
पुढे बोलताना लांबे पाटील मांध्यमांशी बोलताना म्हणाले अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे चालु वर्षी 15 ऑगस्ट पूर्वीच धरण 23 टीएमसी पर्यंत भरले परंतु चालू वर्षी मुळा धरणा मधून जाणाऱ्या डावा व उजवा कॅनॉलच्या कार्यक्षेत्रात सुरुवातीच्या काळात पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन मूग उडीद तूर कापूस,पशु चारापिकांसह इतर पिकांची पेरणी केली परंतु त्यानंतर अति अल्प पाऊस झाल्याने सर्व पिके आज पाण्या अभावी सुकून जळु लागले आहेत, त्यामुळे अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचनीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे,या कडे कार्यक्षेत्रातील राहुरी,नेवासा,शेवगाव-पाथर्डी चे आजी माजी आमदारांन सह पालक मंत्री यांचे दुर्लक्ष असल्यामुळे प्रशासनातील मुळा पाटबंधारे अभियंता सायली पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते मशिनची कळ दाबुन जे पाणी मुळा नदी पात्रात सोडल्याने जो आनंद लाभधारक शेतक-यांना झाला,त्यापेक्षा ते ओहरफ्लोचे पाणी मुळा ऊजवा व डावा कॅनाॅलला सोडले असते तर शेतक-यांनी जास्त आनंद व्यक्त केला असता,कॅनलला पाणी सोडन्याची गरज असताना ते पाणी मुळा नदी पात्रात सोडन्यात आले,सध्या धरणात 2 हजार क्युसेसने पाण्याची आवक सुरु असुन प्रसंगी त्यामंधे आणखी वाढ होन्याची शक्यता नाकारता येत नाही,मुळा धरण पानलोट क्षेत्रात पाऊस चालुच आहे,सध्या धरणातील पाणीसाठा 22 ते 23 द.ल.घ.फु पेक्षा न वाढवता पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे,अशा परिस्थितीत ओहर फ्लोचे पाणी मुळा उजवा व डावा कॅनाॅलला सोडा अन्यथा शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन छेडले जाईल असे शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी शासन व प्रशासनाला सुचक इशारा दिला,
पुढे बोलता लांबे यानी शेतक-यांन प्रती आपल्या भावना व्यक्त करताना,म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच धरण जवळपास भरले आहेत,यंदा १५ ऑगस्ट पूर्वी धरण साठा धरण परिचलन सूची प्रमाणे अगोदरच झाल्याने आज जलसंपदा विभागाला आणखी पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला,येत्या काही दिवसातच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याची परस्तीती निर्माण होणार असुन त्यावेळी मुळा नदी पात्रात पाणी सोडणे गरजेचे आहे,आधी ओहरफ्लोचे पाणी मुळा उजवा व डावा कॅनाॅलला पुर्ण क्षमतेणे सोडा व त्यापेक्षा जास्त पाणी सोडन्याची गरज भासल्यास ते पाणी मुळा नदी पात्रात सोडा अन्यथा शेतक-यांच्या हाता तोडांशी आलेल्या पिकांच्या साठी आम्हाला शेतक-यांना बरोबर घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलण छेडले जाईल प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी इशारा केला आहे.