संगमनेर तालुका व शहर शिवसेना (उबाठा) च्या वतीने रविवार पासून भगवा सप्ताहाचे आयोजन – फड
संगमनेर तालुका व शहर शिवसेना (उबाठा) च्या वतीने रविवार पासून भगवा सप्ताहाचे आयोजन – फड
रविवार पासून यात्रेला प्रारंभ, जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना खेवरे विघानसभा संपर्क प्रमुख सुर्यकांत शिदे महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपनाताई मोरे, संगमनेर महिला आघाडी संर्पक प्रमुख बेबीतांई लांडगे आदि विविध मान्यवरांची उपस्थिती.
संगमनेर –
संपुर्ण राज्यात भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे – निवडणुक चिन्ह मशाल व पक्षाची विचारधारा, नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी रविवारी ११ आँगस्ट रोजी दुपारी ३ वाजता संगमनेर बसस्थानक येथे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, संपर्क प्रमुख सुर्यकांत शिंदे यांचे हस्ते या भगवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती संगमनेर तालुक्यात तालुकाप्रमुख संजय फड व शहर प्रमुख आप्पा केसेकर यांनी दिली.
संगमनेर तालुका व शहरात भगवा सप्ताह साजरा केला जात आहे. तालुका प्रमुख संजय फड यांचे नेतृत्त्वाखाली तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी वस्तीवर मशाल चिन्हं, पक्षाची विचारधारा नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी या यात्रेचा शुभारंभ संगमनेर बसस्थानक येथून शुभारंभ होणार आहे. ही यात्रा दि. ११ ऑगस्ट ते दि. ३० ऑगस्ट अशी २० दिवस चालणार आहे. या यात्रेस शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना खेवरे संगमनेर विघानसभा संपर्क प्रमुख सुर्यकांत शिदे महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपनाताई मोरे, संगमनेर महिला आघाडी संर्पक प्रमुख बेबीतांई लांडगे, जिल्हा समन्वयक दिलीप साळगट , शहर प्रमुख अपाशेठ केसेकर , उप अशोक सातपुते ,संघटक कैलास वाकचोरे , युवा सेना तालुका प्रमुख अक्षय गुंजाळ, महिला आघाडी शितल हासे, युवा सेना शहर प्रमुख अमित चव्हाण, गोविंद नागरे, संघटक गुलाब भोसले व तालुकातील , शहरातील पदअधिकारी व अंगीकृत संघटना , शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आदर्श मानून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
भगवा सप्ताह निमित्ताने संगमनेर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण व प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर भव्य मशाल यात्रा निघणार असून या माध्यमातून शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत व येणाऱ्या विधानसभेला पक्षांचे चिन्ह सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हा भगवा सप्ताह व मशालयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .
तालुका प्रमुख संजय फड यांचे नेतृत्त्वाखाली
या यात्रेमध्ये प्रत्येक गावातील नागरिकांच्या अडीअडचणी शिवसैनिक समजावून घेणार असून त्यावर यात्रा संपल्यानंतर सर्व समस्या सोडविण्यावर शिवसेनेच्या वतीने भर दिला जाणार आहे.
या यात्रेमध्ये तालुक्यामधील सर्व शिवसैनिक, पक्षाचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित राहणार असून तालुक्यातील सर्वच नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संजय फड यांनी केले आहे.
कोट- यात्रा गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधनार आहे, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आदर्श मानून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .नागरिकांच्या सूचना व त्यांचे विचार समजावून घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शिवसैनिक काम करणार असून याबाबतचा अहवाल पक्ष नेतृत्वाला पोहचविणार असल्याचे तालुका प्रमुख संजय फड यांनी सांगितले .