*एक वर्षा पूर्वी घडलेल्या मोटार सायकल चोरी गुन्ह्यांचा तपासाला राहुरी पोलिसांना यश*.
*एक वर्षा पूर्वी घडलेल्या मोटार सायकल चोरी गुन्ह्यांचा तपासाला राहुरी पोलिसांना यश*.
म्हैसगांव प्रतिनिधी…
650,000/- रूपये किमतीच्या 7 मोटार सायकली आरोपीकडून जप्त* .
आरोपीस सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड.
मोटरसायकल चोरी करनाऱ्या चौथ्या टोळीचा छडा.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,
दिनांक 24/08/2023 रोजीचे रात्री दहा ते 25/08/2023 रोजीचे सकाळी सहा वाजता दरम्यान फिर्यादी नामे संग्राम सुभाष भवर राहणार पिंपळाचा मळा राहुरी तालुका राहुरी यांनी त्यांचे राहते घरासमोरून पल्सर मोटरसायकल चोरीला गेले बाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर 965/ 2023 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता . *सुमारे एक वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याच्या* बाबतीत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की वरील गुन्ह्यातील मोटरसायकलची चोरी करणारा रेहान शकील शहा राहणार संगमनेर हा राहुरी शहरात आला आहे व त्यानेच राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरी केलेली आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांनी पथकामार्फत सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीची कबुली दिली त्यानंतर सदर आरोपीस दिनांक 06/08/2024 रोजी अटक करून सदर आरोपीची 7 दिवस पोलीस कस्टडी रिमांड ची मागणी मा. न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियुक्त श्री रविंद्र गागरे यांनी बाजू मांडून केल्याने माननीय न्यायालयाने प्रथम त्याची तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केल्याने रिमांड दरम्यान त्याने व त्याच्या अन्य साथीदाराने चोरलेल्या एकूण 6,50,000 रुपये किमतीच्या सात मोटरसायकल काढून दिल्याने त्या जप्त करण्यात आल्या . अटक आरोपीचे इतर साथीदार अटक करून अजून त्यांनी चोरलेल्या मोटरसायकल जप्त करणे कामी अजून तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मा. न्यायालयाने आज दिनांक 9 8 2024 रोजी दिल्याने पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार गीते,पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके , पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास वैराळ , विकास साळवे, संदीप ठाणगे तपास पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव,, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, नदीम शेख , अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे अमोल भांड यांनी केली.