सिन्नर भाजपाची सामाजिक कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता सेवा कार्यासाठी केले सन्मानित
सिन्नर भाजपाची सामाजिक कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता
सेवा कार्यासाठी केले सन्मानित
सिन्नर प्रतिनिधी
राष्ट्र सर्वप्रथम असे ब्रीद घेऊन जगाच्या पाठीवर सर्वाधिक सदस्य असलेला राजकीय पक्ष म्हणून ख्याती मिळवलेल्या भारतीय जनता पक्ष तळागाळातील सामाजिक कार्यकर्त्यांचाही तितकाच सन्मान करतो याचा दाखला सिन्नरच्या वावी टोल नाक्यावर झालेल्या एका सन्मान सोहळ्याने आपल्या समोर ठेवलाय.
सिन्नर तालुक्यातील वावी टोल नाक्या पुढे मिरगाव फाटा जवळील भूमिकेटर्स च्या कार्यालयात दिनांक 20 सप्टेंबर सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पक्षाच्या माध्यमातून जंनहिताची कामे करत समाजसेवा करणारे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त करणारा हा आगळवेगळा समारोह ठरलाय..
यावेळी तालुक्यातील पूर्व भागातील असंख्य लोकांनी भाजपा पक्षात प्रवेश करत समारंभाची वाढवली . सिन्नर भाजपचे श्रेष्ठी बाळासाहेब तुकाराम हांडे, मुंबई स्थित समाज कर्मी मुकुंद राधाकिसन काकड, भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष
प्रकाश जयराम दबंगे पाटील, पश्चिम सिन्नर अध्यक्ष
बहिरु नामदेव दळवी, भाजपा उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी, तालुका उपाध्यक्ष. सजन सुकदेव सांगळे, भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष. प्रविष्ण निवृत्ती पवार, सिन्नर भाजपा उपाध्यक्ष . रामदास मुरलीधर भोर, जिल्हा सचिव आणि प्रदेश प्रवक्ता
इंजिनियर मीराताई सुदाम सानप,
अंगणवाडी सेविका आणि बचत गट अध्यक्ष प्राजक्ता दौधक बुरुकुल यांचा यावेळी यथोचित सन्मान झाला.
यावेळी भाजपा पुर्व मंडल अध्यक्ष प्रकाश दबंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सिन्नर पूर्व भागातील पाथरे येथील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत विधानसभा निवडणूक प्रभारी जयंत आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला. आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्षाच्या कार्याबद्दल प्रदेश प्रवक्ता मीरा सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.