प्रशासनाने मतदार यादीतील दुबार नावांची स्वतः पडताळणी करावी ; प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी
प्रशासनाने मतदार यादीतील दुबार नावांची स्वतः पडताळणी करावी ; प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी
सिन्नर प्रतिनिधी
विंचूर दळवी व वडगाव परिसरातील अनेक मतदारांना निवडणूक आयोगाने नोटिसा देण्यात आल्या असून नावे रद्द करावी असे या नोटीस मध्ये म्हटले आहे. प्रशासनाने अशा नोटिशी पाठवून जनतेला वेठीस धरू नये. आपल्या यंत्रणेमार्फत स्वतः पडताळणी करून दुबार नावे वगळावीत. अशा आशयाचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सिन्नर तहसीलदारांनादिले आहे. या निवेदनात म्हंटले आले आ की, मृत व्यक्तीचे घरातील नावे कमी होण्याबद्दल कारणे दाखवा नोटीस दिली आहे. शासनाकडून जन्ममृत्यूची नोंद करण्यासाठी विभाग आहेत. प्रत्येक गावातील मृत्यू नोंदीचा अहवाल मागून घ्यावा.त्याप्रमाणे नावे वगळावीत.अपवादक परिस्थितीमध्ये योग्य ती छाननी करावी.जनतेला वेठीस धरू नये.तालुक्यामध्ये अनेक मुलींचे लग्न झाले आहेत.त्या बाहेरगावी आहेत.त्यांचे दोन दोन ठिकाणी नावे आहेत. त्याची शासनाने पडताळणी करावी.अशी प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी आहे. वडगाव पिंगळा परिसरातील नागरिकांनी नानेगावचे सरपंच प्रहारचे नाशिक जिल्हाध्यक्ष शरद शिंदे व जनशक्तीचे तालुकाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून आलेल्या नोटिसीबद्दल माहिती दिली आहे. प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष कैलास दातीर, युवा नेते गोरख वाडेकर,कामगार नेते शशिकांत गायकवाड शहर कार्याध्यक्ष गणेश थोरात शेतकरी नेते अर्जुन जगताप, महिला तालुका अध्यक्ष पुष्पा भोसले, चंद्रकांत डावरे, कपिल कोठुरकर आदी नागरिकांची
नावे निवेदनात आहेत.