सिन्नर लोककलावंत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा


सिन्नर लोककलावंत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा
सिन्नर प्रतिनिधी
लोककलावंत सांस्कृतिक महोत्सव सिन्नर 2024 सह्याद्री युवा मंच सिन्नर भारत भूषण कलापथक पथनाट्य कला मंच यांचे लोक कलावंतांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला
महाराष्ट्रातील पारंपारिक लोककलेचा वारसा जतन करण्याचे कार्य तमाशा लावणी गोंधळ पिंपळा पोतराज बहुरूपी आदिवासी पावरा नृत्य बोहडा भजन कीर्तन सनई संबळ ब्रास बँड हलगी ढोलकी इत्यादी लोक कलावंतांनी केलेले आहे कार्यक्रमाचे उद्घाटक उदय भाऊ सांगळे यांनी केले अध्यक्ष स्थान कवी शाहीर बाळासाहेब आव्हाड यांनी भूषविले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वसंतराव जगताप विश्वास कांबळे सर सोमनाथ गायकवाड प्रसिद्ध लावणी समृद्धी नंदाताई पुणेकर संगीता महाडिक पुणेकर शकुंतला चव्हाण नगरकर पार्श्वगायिका ज्योतीताई धुमाळ तात्याराव महाराज भोई बाळासाहेब साबळे डीएम वाकळे सर सुरेशराव देडे अजय पवार सुधीर रुपवते समृद्धी सर्वर इत्यादी मान्यवर उपस्थित होते मनोगत वसंतराव जगताप विश्वास कांबळे सोमनाथ गायकवाड उदय भाऊ सांगळे बाळासाहेब आव्हाड अनेक लोककलावंतांनी पुरस्काराने व उपस्थिती पत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक भारत भूषण कालापथक पथनाट्य कला मंच चे विनायक आव्हाड भीमसेन साळवे अजित मोमीन सुरेश घोडेराव निवृत्ती गीते अशोक जगताप रंजना आव्हाड यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन कवि विजय कुमार कर्डक कवी अशोक शिंदे यांनी केले यावेळी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील लोक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा नेते व भावी आमदार उदय भाऊ सांगळे यांनी असे आवाहन केले की लोककलावंतांच्या गुणांना वाव मिळावा त्यांच्या गुणांना प्रसिद्धी संपूर्ण भारतभर मिळावी स्थानिकांची ओळख प्रसिद्ध व्हावी म्हणून त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून लोककलावंतांना वाव देण्यात आला. सिन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामनाथ झगडे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
संयोजकांनी आभार मानून कार्यक्रम सांगता केली.



