के. के.वाघ संस्थेत विद्यार्थ्यांनी जाणून घेतली वारली चित्रशैली • अकराशेपेक्षा अधिक भावी अभियंत्यांनी घेतला सहभाग.
के. के.वाघ संस्थेत विद्यार्थ्यांनी जाणून घेतली वारली चित्रशैली •
अकराशेपेक्षा अधिक भावी अभियंत्यांनी घेतला सहभाग.
नाशिक (प्रतिनिधी)
अकराशे वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैली ११०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. या साध्यासोप्या पर्यावरण पूरक व निसर्गस्नेही कलेचे मर्म पत्रकार व वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर यांनी सोप्या पद्धतीने उलगडून दाखवले. विविध कलाकृती सादर करुन विद्यार्थ्यांकडून तशी आकर्षक, सुंदर चित्रे रेखाटून घेण्यात आली. भौमितिक आकार, रेषा, ठिपके यांचा वापर करीत विद्यार्थ्यांनी कल्पकतेने कलानिर्मिती केली. ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चित्रे रेखाटली त्यांना पारितोषिके देण्यात आली. के.के.वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेत यंदा नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत आहे. प्रथमवर्ष बीटेक् विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रशैली परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी ११०० वर्षांची परंपरा असलेल्या जगप्रसिद्ध वारली कलेचा इतिहास, पर्यावरण पूरक व निसर्गस्नेही वारली चित्रशैलीची वैशिष्ट्ये, रेखांकनाच्या पद्धती याविषयी माहिती दिली. चार दिवस सुरु असलेल्या या उपक्रमाने भावी अभियंत्यांना कलेद्वारे नवीन ऊर्जा मिळाली. संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ यांच्या संकल्पनेनुसार प्राचार्य डॉ. के.एन.नांदूरकर, विभागप्रमुख डॉ.अनुराधा पवार यांनी आयोजन केले. समन्वयक विलास पाटील, प्रा.के.एस.बंदी, प्रा.ज्ञानेश्वरी पाटील, प्रा.सागर शिंदे ,सुमन कहांडळ व इतर सहकाऱ्यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. लवकरच वारली चित्रशैली विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. चौकट कलेचा स्पर्श जीवन समृद्ध करतो ! कोणत्याही कलेत रमल्याने ताणतणाव दूर होतात. कलेचा स्पर्श मानवी जीवन समृद्ध करतो. नवीन ऊर्जा मिळून समाधानी जीवन जगण्याचा आनंद वाढतो. यासाठी दि.१० ते २१ या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात विविध कलातज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. नखचित्रांचे प्रात्यक्षिक किरण जगताप यांनी सादर केले. किरण खाडे यांनी ओडिसी नृत्याचे प्रशिक्षण दिले. पुस्तकांच्या आजी भीमाबाई जोंधळे यांची मुलाखत प्रा.डॉ. सुनील कुटे यांनी घेतली. त्यातून सातत्याने वाचनाचे महत्व अधोरेखीत झाले.
के. के.वाघ संस्थेत विद्यार्थ्यांनी जाणून घेतली वारली चित्रशैली • अकराशेपेक्षा अधिक भावी अभियंत्यांनी घेतला सहभाग.