आशापुर येथे महिला भजनी मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग
आशापुर येथे महिला भजनी मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग
सिन्नर
सिन्नर तालुक्यातील आशापुर टेंभुरवाडी येथे दिनांक २४ एप्रिल रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . त्याप्रसंगी गावकरी मंडळी व वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अखंड हरिनाम सप्ताहात अनेक प्रख्यात किर्तनकारांचे किर्तन सेवा आयोजित करण्यात आली. दिंडी सोहळ्यात अबाल वृद्ध तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत फुगड्या खेळत आनंद साजरा केला तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीची मिरवणूक काढण्यात आली.
गावातली हनुमान भजनी मंडळी , सप्ताह कमिटी कडून रात्री भजनी भारुड आयोजीत करण्यात आले होते. त्या प्रसंगी कचरू पाटोळे, पुंडलिक पाटोळे, दशरथ पाटोळे, सरपंच दीपक पाटोळे, बबन पाटोळे, कोंडाजी पाटोळे,नाना पाटोळे, विशाल महाराज, सोहम महाराज, दिगंबर महाराज ,अमोल पाटोळे, नारायण पाटोळे, विष्णुपंत पाटोळे,
पोलिस पाटील भाग्यश्री पाटोळे, पार्वतीबाई पाटोळे, चांगुणा पाटोळे, सत्यभामा पाटोळे लताबाई कडलग, मंदा, हिराबाईपाटोळे, चांगुना पाटोळे या महिला भजनी मंडळी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत नियोजन केले.