ताज्या घडामोडीसामाजिक

यवतमाळ येथे झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाईची सिन्नर सत्यशोधक प्रतिष्माठान तर्फे मागणी 


यवतमाळ येथे झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाईची सिन्नर सत्यशोधक प्रतिष्माठान तर्फे मागणी 

सिन्नर

दिनांक 29 एप्रिल 2024 श्रीमान सत्यशोधक प्रतिष्ठान तसेच इतर संघटनेंच्या मार्फत यवतमाळ शहरात बहुजनांचे कैवारी महात्मा जोतिराव फुले अर्थात तात्यासाहेब यांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबने बाबत सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई होण्याबाबत मागणी करण्यात आली….

दिनांक 21 एप्रिल रोजी यवतमाळ शहरातील आझाद चौक येथील महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याला पाठीमागून काळा रंग किंवा डांबर सदृश फेकल्याचे निदर्शनास आलेले होते.

Advertisement

रयतेचा राजा शिवछत्रपती महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु तसेच शेतकरी, कष्टकरी, वंचित, शोषित समाजाला आपली मूळ संस्कृतीची व जीवन जगण्याची ओळख करून देणारे, सयाजीराव गायकवाड महाराज, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे या सर्व थोर विभूतींचे आदर्श, महात्मा पदवीधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले अर्थात तात्यासाहेब यांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे समस्त बहुजन व शूद्रतीशूद्र व स्त्रियांचा अपमान आहे. तरी या घटने चा जलद गतीने तपास व्हावा व दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी नम्र विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली तसेच प्रशासनाला महापुरुषांच्या पुतळा परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित करावी, पुतळा परिसरात कुंपण घालण्यात यावे, पोलीस ग्रस्त ठेवण्यात यावी, स्वच्छता ठेवण्यात यावी, पुरेसा प्रकाश असावा यासाठी दिवे लावण्यात यावे, पुतळ्यांना छत लावण्यात यावे, महापुरुषांच्या पुतळ्यांना त्यांच्या जयंतीच्या अनुषंगाने दरवर्षी डागडुजी व रंग रंगोटी करण्यात यावी अशा पद्धतीच्या अत्यावश्यक सूचना शासकीय स्तरावर घेण्यात याव्या की जेणेकरून भविष्यात अशी निंदनीय घटना घडणार नाही असे देखील निवेदनामध्ये नमूद केलेले आहे. अशा दोशी व्यक्तींना त्वरित त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच याबाबत दिरंगाही झाल्यास होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील कारण जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया प्रत्यक्ष अप्रत्यक्ष महाराष्ट्रातून येत आहेत असे देखील लेखी या निवेदनामध्ये सादर केलेले आहे

निवेदन देते वेळी दीपक मंडलिक, सागर मोरे, राजश्री गायकवाड, सचिन खोडे, रमाकांत सोनवणे, निर्भय बनो संघटने चे महामित्र वायचळे, कॉ हरीभाऊ तांबे, राजाराम मुरकुटे तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जिल्हा अध्यक्ष धनंजय टिळे व सर्व समाजसेवक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *