ताज्या घडामोडीसामाजिक

स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन


महिरावणी येथे विद्यार्थ्यांकडून मतदार रॅलीद्वारे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन 

स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक: प्रतिनिधी 

महिरावणी येथे ग्रामपंचायत,मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालय आणि जि.प. प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम (स्वीप)अंतर्गत महिरावणी गावामध्ये प्रभात फेरीद्वारे मतदार जनजागृती रॅलीचे सरपंच कचरु वागळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसरपंच सोमनाथ खांडबहाले,पोलीस पाटील अॅड.दिपाली कैलास खांडबहाले तसेच ग्रामपंचायत सदस्य, माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे,जि प प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक दीपक उशीर, ग्रामसेवक जी.एन. गायकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अमोल नेहे,पशुसंवर्धनचे डॉ. कुटे, आरोग्यसेवक – के.के.गोडे, आशा स्वयंसेविका- कुसूम वाघ, मुक्ता वागळे, अंगणवाडी सेविका – नंदा पाडेकर, इंदिरा पाटील, मदतणीस – संगिता वाघ आणि बचतगटाच्या फशाबाई वागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले.

Advertisement

स्वीपअंतर्गत मतदार जनजागृती अभियानांतर्गत माध्यमिक व प्राथमिक शाळेमध्ये प्रथम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले नंतर विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदानाचे महत्त्व सांगितले. या अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘मतदान जनजागृती, मतदानाचे महत्त्व,माझे मत माझा अधिकार’ या विषयांवर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा घेण्यात घेण्यात आल्या.मुलांना मतदानाचे महत्त्व कळावे म्हणून संपूर्ण गावातून रॅलीचे आयोजन करत मतदार जनजागृती करण्यात आली.यावेळी मतदार रॅली यशस्वीतेसाठी संजय पवार, बाळासाहेब सोनवणे, देवेंद्र देवरे, संजय गायकवाड, सुरेखा आहेर, अश्विनी चौरे, दिपाली वाडीले, खंडू लांबे,दिलीप खांडबहाले, विलास येवले,रवींद्र चौरे,सुनिल शिंदे,कल्पना चौधरी,योगिता नाईक,अलका वाणी,शितल सूर्यवंशी,शुभांगी गोसावी आदींसह माध्यमिक व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महिरावणी येथील प्रतिष्ठित नागरिक,पालकवर्ग, आरोग्य विभाग, आशा वर्कर,ग्रामपंचायत महिरावणी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते.

 

*चौकट*

महिरावणी येथे ग्रामपंचायत, मातोश्री गी.दे. पाटील माध्य.विद्यालय व जि. प. प्राथ. शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गावातुन मतदान जनजागृती रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती विषयक “मतदान करणे माझे कर्तव्य,मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो,तुमचे मत आमचे भविष्य” इ. विविध घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तसेच ग्रामपंचायतजवळ इ. ७ वीच्या मुला-मुलींनी पथनाट्यांचे उत्कृष्टपणे सादरीकरण करत मतदान विषयक जनजागृती केली.प्राथमिक व माध्यमिक शाळेने राबविलेल्या या वेगळ्या उपक्रमाचे गावातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.

कचरू वागळे,

सरपंच,ग्रामपंचायत,महिरावणी ता.जि. नाशिक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *