ओंकार संगीत विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा
ओंकार संगीत विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि कला प्रदर्शन सोहळा दिमाखात पार पडला.
सिन्नर प्रतिनिधी:
येथील ओंकार संगीत प्रतिष्ठान संचलित, ओंकार संगीत विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा ज्येष्ठ संगीतकार पंडित शंकरराव वैरागकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचे अध्यक्ष सतीश नेहे, सुप्रसिद्ध साहित्यिक किरण भावसार,
सिल्व्हर लोटस स्कूलच्या मुख्याध्यापिका मनीषा गुरूळे, ओंकार संगीत विद्यालयाचे संचालक भारत मांडे आदी उपस्थित होते.
या संगीत सोहळ्यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभंग, भावगीते, भक्तीगीते, गौळण, रामभजन असे विविध गीत प्रकार त्याचबरोबर शास्त्रीय हार्मोनियम वादन , तबला वादन सादर करीत मैफिलीत रंगत आणली. सुमारे १० ते १६ वयोगटातील विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते. विविध संगीत प्रकारात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गायत्री मांडे व संचिता मांडे यांनी संगीत विशारद पदवी प्राप्त केल्याबद्दल पंडित शंकरराव वैरागकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पंडित शंकरराव वैरागकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मिश्कील भाषेत मार्गदर्शन करीत एक अभंग व भैरवी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय निर्मळ व गायत्री मांडे यांनी केले. ओंकार मांडे यांनी आभार मानले.