मोरया जॉगर्स क्लब आणि नाशिक योग विद्या केंद्र यांच्या विद्यमाने मोफत योग शिबिराचे आयोजन
मोरया जॉगर्स क्लब आणि नाशिक योग विद्या केंद्र यांच्या विद्यमाने मोफत योग शिबिराचे आयोजन
नाशिक प्रतिनिधी
आजारी पडल्यावर उपचार करण्या ऐवजी आजारी पडूच नये म्हणून योग साह्यभूत ठरतो. हीच बाब लक्षात घेऊन मोरया जॉगर्स क्लब व नासिक योग विद्या केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ( गोल्फ क्लब) नाशिक येथे बुधवार दि.१ मे (महाराष्ट्र दिन) ते रविवार दि.१२ मे पर्यंत रोज सकाळीं ६.४५ ते ७.४५ या वेळेत मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर १८ वर्षा पुढील सर्व वयोगटासाठी खुले असून, सहभागींना या शिबिरात अनुभवी आणि प्रशिक्षित असे योग शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे,व शिबिर पुर्ण करणार्या सर्व सहभागींना तसे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.तरी
Advertisementपरिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
असे आवाहन मोरया जॉगर्स क्लब चे अध्यक्ष श्री भगवान पाटील यांनी केले आहे.
वरील QR कोड द्वारे सहभागी होऊन आपला प्रवेश निश्चित करावा..
अथवा मो. ९८८१२५८८३५ या क्रमांकावर संपर्क करावा.
बॉक्स :-
सध्याच्या धकाधकीच्या जीवन शैलीत मानसिक व शारीरिक ताण-तणावाला सर्वच वयोगटातील व्यक्तींना आज सामोरे जावे लागत आहे आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला स्वतःकडे पाहण्यासाठी अजिबात पुरेसा वेळ नाही.त्यामुळे शरीर आणि मनाच्या व्याधींच्या तक्रारीत वाढ होत आहे, त्यासाठी थोड्या वेळात योगाभ्यास करून आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही वयोगटातील लोकांना योग करता येतो