ऑनलाईन प्रेमाची ऑफलाईन कहाणी – कादंबरी वाचकांच्या भेटीला
ऑनलाईन प्रेमाची ऑफलाईन कहाणी – कादंबरी वाचकांच्या भेटीला
कल्याण प्रतिनिधी
आधुनिक काळाशी सुसंगत मांडणी आणि समाज माध्यमांशी जोडली गेलेली तरुण पिढी यांचं वेधक भाव विश्व मांडणारी ऑनलाइन प्रेमाची ऑफलाइन कहाणी ही कादंबरी वाचकांच्या तसेच युवा वर्गाच्या मनावर अधिराज्य गाजवेल, असे मत अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि साहित्य अकादमीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक यांनी व्यक्त केले.
कल्याण येथील बी के बिर्ला महाविद्यालयांमध्ये आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत कादंबरीचे प्रकाशन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर पराडकर, मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. बळीराम गायकवाड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.
पृथ्वीराज तौर, कवी गीतेश शिंदे, किरण भावसार, विकास पाटील, मयूर राजपूत आदी उपस्थित होते.
प्रतिभा संगम साहित्य संमेलनातून तरुण पिढी लिहीती झाली. युवा लेखक प्रवीण पवार ही प्रतिभा संगम साहित्य संमेलनाची देणगी आहे. भरकटलेल्या युवा पिढीला प्रतिभा संगमने ऊर्जा देऊन त्यांच्यात लिहिण्याची उर्मी निर्माण केली. प्रवीण पवार आपल्या लेखनाद्वारे साहित्य क्षेत्रातील आपली उंची वाढवत नेईल. असा विश्वास पाठक यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्राध्यापक डॉक्टर पृथ्वीराज तौर, विकास पाटील यांची ही भाषणे झाली. याप्रसंगी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक नितीन केळकर प्रवीण देशमुख शामसुंदर पांडे, प्रा. विजय लोहार, प्रा. डॉ. अरुण ठोके, आरती शिरवाडकर, पद्माकर देशपांडे, दिनेश नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कवी गितेश शिंदे यांनी केले. आभार मयूर राजपूत यांनी मानले
.ऑनलाईन प्रेमाची ऑफलाईन कहाणी या युवा लेखक प्रविण पवार यांच्या कादंबरीचे प्रकाशन करताना साहित्य अकादमीचे सदस्य व अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष ध्यक्ष नरेंद्र पाठक, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्रीधर पराडकर, मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. बळीराम गायकवाड,कवी गीतेश शिंदे, मयूर राजपूत, विकास पाटील,प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर, किरण भावसार आदी उपस्थित होते.