ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ सत्यजित तांबे यांनी बस स्थानकावर केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभा राहणार


आ सत्यजित तांबे यांनी बस स्थानकावर केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी

 

 

आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभा राहणार

 

संगमनेर (प्रतिनिधी)–

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवक आमदार सत्यजित तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून बस स्थानकासमोरील जागा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी नुकतीच मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केली असून या जागेची पाहणी युवा आमदार सत्यजित तांबे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरच होणार असल्याने संगमनेर शहराच्या वैभवात भर पडणार आहे .

 

संगमनेर बसस्थानक येथे प्रशस्त व दर्शनी भागावर हा पुतळा व्हावा याकरता या जागेची पाहणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली यावेळी समवेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड ,युवक काँग्रेसचे निखिल पापडेजा , नगरसेवक शैलेश कलंत्री, नितीन अभंग, आर्किटेक्ट अरविंद वैद्य, राज काझी, बांधकाम अभियंता पंकज मुंगसे, शुभम दिसले, राजेंद्र गुंजाळ आदींसह युवक पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

 

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सौ दुर्गाताई तांबे यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर नगरपरिषदेने 2018 मध्ये महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या करता नगरपालिकेला बस स्थानकावर जागा मिळावी याकरता प्रस्ताव दिला होता. 2019 नंतर या कामाकरता आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

 

मागील आठवड्यात पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी या जागा हस्तांतरणाला अंतिम मंजुरी दिली असल्याने या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले.

 

यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा प्रशस्त व दर्शनी जागेत व्हावा याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी स्वतः येऊन पाहणी केली याचबरोबर आर्किटेक्ट व अधिकाऱ्यांना सूचना केल्या सर्वसामान्यांना सहज दर्शन घेता येईल व हार टाकता येईल अशा पद्धतीने महाराजांचा पुतळा व्हावा अशी सूचनाही त्यांनी केली.

 

याचबरोबर सध्या असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवर भव्य शहीद स्मारक होणार असून याच ठिकाणी 100 फुटी तिरंगा झेंडा उभारण्याचे नियोजित असल्याचेही सत्यजित तांबे यांनी सांगितले

 

चौकट

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पूर्णाकृती पुतळा होणार.

 

आमदार बाळासाहेब थोरात यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा याकरता सातत्याने पाठपुरावा केला असून सुशोभीकरणासह डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा ही आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर उभारला जाणार असल्याचेही आमदार तांबे यांनी सांगितले

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *