अवैध दारू तस्करांसोबत पोलिस अधिकाऱ्यांचा वाढदिवस ;पूर्व आय जींच्या त्या आदेशाचे विस्मरण* व्हायरल फोटोमुळे वणीचे उपनिरीक्षक चर्चेत
*अवैध दारू तस्करांसोबत पोलिस अधिकाऱ्यांचा वाढदिवस ;पूर्व आय जींच्या त्या आदेशाचे विस्मरण*
व्हायरल फोटोमुळे वणीचे उपनिरीक्षक चर्चेत
नाशिक प्रतिनिधी
सेनापती प्रामाणिक असला तरी मोहीमेवर जाणारे सैन्य फंदफितूरीत अडकले तर प्रांत गमावण्याची वेळ येते. जिल्ह्यात विविध काळ्या धंद्याविरुद्ध पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने अतिरिक्त पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर , कळवण उपविभागिय अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्यासारखे ग्रामिण पोलीस दलातील काही पोलीस अधिकारी कर्तव्याशी प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही मान खाली घालावी लागत आहे. वाढदिवस ही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे पोलिसांनी आपला वाढदिवस पोलिस ठाण्यात सार्वजनिकरित्या साजरा न करता घरीच साजरा करावा, असा आदेश नाशिक परीक्षेत्राचे पूर्वाश्रमीचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी दिला होता. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना हा आदेश देण्यात आला असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. काही अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाण्यांमध्ये वा कार्यालयात आपले वाढदिवस सार्वजनिक स्वरुपांमध्ये साजरे करीत आहेत. हे वाढदिवस साजरे करताना बर्याच वेळा ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्ती, दारु, मटका व इतर अवैध धंदा करणारे, पोलिसांवर दबाव आणणारे इत्यादी लोकही सहभागी झालेले दिसून आले आहेत. त्याच प्रमाणे वणी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक विजय कोठावळे यांच्या वाढदिवस वणी परिसरातील अवैध दारू तस्करांनी वणी पोलिस ठाण्यामध्ये साजरा करण्याचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या सर्व प्रकारामुळे पोलिस खात्याची प्रतिमा डागाळली जावून समाजामध्ये एक वेगळाच संदेश जात आहे त्यामुळे जनतेमध्ये पोलिसांबद्दल मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल व वाईट मत तयार होत आहे.