ताज्या घडामोडीसामाजिक

*डॉ वैष्णवी नेहे-चव्हाणके यांना प्राइड ऑफ इंडिया नॅशनल पुरस्कार जाहीर*


*डॉ वैष्णवी नेहे-चव्हाणके यांना प्राइड ऑफ इंडिया नॅशनल पुरस्कार जाहीर*

सिन्नर प्रतिनिधी 

वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात

Advertisement

उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर संस्था नाशिक यांचेकडून प्राइड ऑफ इंडिया नॅशनल या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी डॉ वैष्णवी सतिश नेहे- चव्हाणके यांची निवड झाली असून 1 सप्टेंबर 2024 या दिवशी नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. यापूर्वी ही डॉ वैष्णवी नेहे-चव्हाणके यांना राष्ट्रिय स्वयंसिद्धा पुरस्कार, राष्ट्रिय दीपस्तंभ पुरस्कार , नक्षत्र नवदुर्गा पुरस्कार व महाराष्ट्रची हिरकणी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून किशोरवयीन मुली व महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले असून, किशोरवयीन मुली व त्यांचा समस्या व त्यावरील उपाय, मासिक पाळीबद्दल समज व गैरसमज यावर वैद्यकीय कॉलेजला शिक्षण घेत असल्यापासून व सामाजिक कमाची आवड असल्यामुळे २०१८ पासून नाशिक जिल्हा व अहमदनगर जिल्ह्यामधे अनेक शाळा, कॉलेज व सामाजिक उपक्रमामध्ये रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नर, कामगार शक्ति फाउंडेशन सिन्नर, प्रतिक्षा हायजिन कंपनी सिन्नर या सर्वांच्या सहकार्यातून डॉ वैष्णवी नेहे – चव्हाणके यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबीरे घेतली आहेत. आत्तापर्यंत ५० हून अधिक शिबिरे घेतली असून ५०००+ विद्यार्थिनींना व २०००+ महिलांना आरोग्यविषयक विषयक शिबिराचा लाभ झाला आहे. आत्तपर्यंत झालेल्या सर्व शिबिरांमध्ये प्रतिक्षा हायजिन कंपनी सिन्नर तर्फे सेनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *