नांदूर शिंगोटे येथे शिवशाही बस नादुरुस्ती मुळे ट्राफिक जाम नांदूर दुरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी एक तास उभे राहून केली वाहतूक सुरळीत
नांदूर शिंगोटे येथे शिवशाही बस नादुरुस्ती मुळे ट्राफिक जाम
नांदूर दुरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी एक तास उभे राहून केली वाहतूक सुरळीत

नांदूर शिंगोटे वार्ताहर
नांदूर शिंगोटे येथे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असून नांदूर शिंगोटे गावाबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याचे कोंकटी करण्याचे काम सुरू असल्याकारणाने नांदूर गावातून सर्व लहान-मोठी वाहने हे जा करत आहे त्यामुळे निमोन नाका परिसरामध्ये कायमचेच वाहतूक ट्राफिक जाम हे नित्याचे झाले आहे.
आज गुरुवार रोजी सकाळी निमोण नाका परिसरात अचानकपणे रस्त्याच्या मधोमध शिवशाही बस निकामी झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्याचप्रमाणे नांदुर-शिंगोटे लोणी रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वाहने उभी राहिल्यामुळे वाहतुकीची एकच कोंडी निर्माण झाली होती सदरच्या बस नादुरुस्ती मुळे एक एक हजार फुटावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या हा प्रकार लक्षात येतात नांदूर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन एक तासांमध्ये सर्व वाहतूक सुरळीत केली नंदुर-शिंगोटे येथील या वाहतुकीला कायमचा काहीतरी लगाम घालावा यासाठी रस्त्यावर आलेली अनेक दुकाने कारणीभूत ठरत आहे .
या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक जामचे प्रकार वाढलेले असून रस्त्याच्या कडेने चालणे सुद्धा मुश्किल झालेले आहे तेव्हा या भागातील रस्त्यावर आलेली अनेक दुकाने वाहतुकीला कारणीभूत ठरत असल्याचा प्रकाश समोर येत असल्याने या ठिकाणावरील ही दुकाने त्वरित हटवणे महत्त्वाचे असताना यासाठी वरिष्ठ पातळीवरून कार्यवाही होणे गरजेचे आहे.

चौकट
नांदूर शिंगोटे येथे ट्राफिक जाम होण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे दिवसांमध्ये अनेक वेळा या ठिकाणी ट्रॅफिक जाम हा प्रकार पहावयास मिळत आहे मात्र हे ट्राफिक जाम कायमस्वरूपी बंद करण्यासाठी काहीतरी उपाय योजना होणे महत्त्वाचे आहे.



