ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवयुवकांना मतदार नाव नोंदणीची 23 एप्रिल ही अंतिम संधी


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024:

नवयुवकांना मतदार नाव नोंदणीची 23 एप्रिल ही अंतिम संधी

नाशिक प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी माहे एप्रिल-2024 मध्ये 18 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु अद्यापही आपले नाव मतदार यादीत न नोंदविलेल्या नवयुवकांना आपले नाव नोंदवण्याची अंतिम मुदत दि. 23 एप्रिल, 2024 आहे. तरी संबंधितांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम दि.16/03/2024 रोजी जाहीर केला असून नाशिक जिल्ह्यातील 02-धुळे, 20-दिंडोरी आणि 21-नाशिक या लोकसभा मतदार संघात पाचव्या टप्प्यात दिनांक 20 मे, 2024 रोजी मतदान पार पडणार आहे.
सदर मतदानाकरिता मतदार यादी अद्ययावतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असुन दिनांक 23 एप्रिल, 2024 अखेर मतदार यादीत नाव नोंदविण्याची अखेरची संधी आहे. दिनांक 23 एप्रिल, 2024 अखेर प्राप्त होणारे मतदार नोंदणी फॉर्म नं.6 वर नामनिर्देशनाचे अंतिम दिनांक 3 मे, 2024 पर्यंत मतदार नोंदणी अधिकारी प्रक्रिया पूर्ण करुन मतदार यादी अंतिम करणार आहेत.

Advertisement

 

तरी माहे एप्रिल-2024 रोजी 18 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु अद्यापही आपले नाव मतदार यादीत न नोंदविलेल्या नवयुवकांनी त्वरित Voter Service Portal, Voter Helpline App किंवा आपल्या भागातील बीएलओ यांचेमार्फत दिनांक 23 एप्रिल, 2024 अखेर फॉर्म नं.6 भरुन जमा करावा व दिनांक 20 मे, 2024 रोजी आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *