जागा मिळणे हा आपला हक्क आहे – रिंपाई कार्यकर्ते
आश्वी : प्रतिनिधी
2024 लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली युती व आघाडीमध्ये मित्र पक्षांना जागा वाटपावरुन सन्मान मिळत नसल्यांचे चित्र दिसत असून 13 वर्षापासून मैत्रीचा प्रामाणिकपणे धर्म निभावत असल्याने रामदास आठवले यांनी शिर्डी व सोलापूर या दोन जागा रिपाई पक्षासाठी मागीतल्या मात्र भाजपा मित्र पक्षाकडून अद्याप विचार न झाल्याने संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यामध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र दिसत असल्याने रिपाई पक्षांची ठोस भूमिका घेण्याकरिता केद्रींय मंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पुणे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी सांगितले तर या बैठकीकडे भाजपाच्या नेत्याचे लक्ष्य ! लागले आहे .
गेल्या अनेक दिवसापासून रामदास आठवले यांनी राज्यासह देशात विविध ठिकाणी कार्यक्रम घेवून मोदी सरकारचे कौतुक करत आपला मैत्री धर्म पाळत आहे मात्र महाराष्ट्र राज्यातील भाजपा नेत्याकडून रिपाई पक्षाला योग्य प्रकारे सन्मान मिळत नसल्याचे कार्यकर्त्याच्या चर्चातून दिसत आहे .2024 लोकसभेच्या निवडणुकीकरिता स्वतः आठवले यांनी शिर्डी व सोलापूर या राखीव जागा मागितल्या . मात्र अजूनपर्यत यावर कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही काना मागून आले आणि तिखट झाले या वाक्यानुसार शिवसेना शिंदे गट , अजित पवार व मनसे बाबत तातडीने निर्णय घेतला जात असल्याने रिपाई पक्षाने कुठले घोडे मारले म्हणजे प्रामाणिक पणाचे हे फळ मिळणार असेल तर संपूर्ण राज्यात आंबेडकर अनुयायी वेगळी भूमिका घेवू शकते , त्यामुळे रामदास आठवले जिकडे सत्ता तिकडे आता पर्यंतचा इतिहास पुसला जाणार नाही हे सत्य आहे .
नुकतेचं रामदास आठवले यांनी नव्या मित्रांमुळे जुन्या मित्रांना विसरू नका,असा खोचक टोला राज्यातील भाजपाला लगावला होता . रिपाईला किमान दोन जागा तरी मिळायला पाहिजेत,त्यामुळे शिर्डी आणि सोलापूर या दोन जागांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आज ही बोलत आहे
शिर्डीमधून स्वतः रामदास आठवले तर सोलापूरमधून राजा सरवदे हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. आरपीआयला जागा न मिळाल्यास मोठी नाराजी कार्यकर्त्यामध्ये पसरण्याची शक्यता आहे. जागा मिळणे हा आमचा हक्क आहे, असे कार्यकर्ते नमूद करत आहे . रामदास आठवले यांना शिर्डीची जागा दया ही भूमिका विविध बैठका मधून कार्यकर्त्यानी बोलून दाखवली वेळप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , स्थानिक भाजपा नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावरही कार्यकर्त्यानी आपल्या भावना केल्या मात्र अदयाप ही त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला नाही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही उलट दुसर्याकरिता त्याकडून प्रयत्न झाल्याचे दिसून आले आहे .
भाजपाकडून सोलापूरच्या जागेकरिता उमेदवार घोषित झाला आहे मात्र शिर्डीचा उमेदवार अदयाप घोषित झाला नाही शिर्डीची जागा ही रामदास आठवले यांनाचं मिळावी अन्यथा असंतोष निर्माण होवू शकतो कार्यकर्ते आक्रमकच्या भूमिकेत दिसत असून यांची झळ राज्यासह शिर्डी , नगर दक्षिण मध्ये निश्चित दिसेल असे मत रिपाई राज्याचे उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी सांगितले .
भाजपा शिर्डीबाबत स्पष्ट भूमिका घेत नसल्याने कार्यकर्त्यामध्ये असंतोष निर्माण झाला असून तसेच येणाऱ्या लोकसभेच्या रणनितीबाबत ठोस भूमिका घेण्याकरिता केद्रींय व राज्य पदाधिकाऱ्यांची केद्रींय मंत्री ना रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी सकाळी 11.०० वाजता पुणे येथील ‘द लेडीज क्लब’ ३, तरापोरे रोड, दस्तुर शाळेसमोर, कॅम्प, पुणे* येथे होणार असल्याची माहिती विजयराव वाकचौरे यांनी दिली आहे .
चौकट
2024 ही निवडणुक सर्व पक्षाने अस्तित्वाची केली असून संकटकाळी साथ देण्याऱ्या मित्र पक्षांना म्हणजे आंबेडकरी अनुयायांना ग्राह्य धरले जात नसल्याचे चित्र दिसत आहे महाविकास आघाडीकडून वंचित झुलावले जात आहे तर भाजपा – युतीकडून रिपाई ( आठवले ) यांना झुलावंले जात असेल तर आता सर्व गटा – तटांनी एकत्र येवून अस्तित्वाची लढाई लढले पाहिजेल अशी भावना कार्यकर्त्यामधून होताना दिसत आहे . शिर्डीची जागा न दिल्यास हा असंतोष लवकरचं उफाळून येईल
विजयराव वाकचौरे
रिपाई राज्य उपाध्यक्ष