सिन्नर मतदार संघावर काँग्रेसने ठोकला दावा ; बाळासाहेब थोरातांना सिन्नर मधून उमेदवारी करण्याचा आग्रह
सिन्नर मतदार संघावर काँग्रेसने ठोकला दावा ;
बाळासाहेब थोरातांना सिन्नर मधून उमेदवारी करण्याचा आग्रह
सिन्नर प्रतिनिधी
सिन्नर तालुका काँग्रेसकमिटीची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी दुपारी 12वाजता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्येक्ष विनायक सुदाम सांगळे यांच्या अध्येक्षते खाली शासकीय विश्राम गृह या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीत प्रामुख्याने खालील विषयावर चर्चा व ठराव सहमत झाले.
प्रामुख्याने या बैठकीत येत्या विधानसभा निवडणुका या दोन महिन्यावर आल्या आहेत या मुळे सिन्नर विधानसभा मतदारसंघ ही काँग्रेसची जागा होती व ती मागील निवडणुकीत काँग्रेस ने ती राष्ट्रवादी काँग्रेस करिता सोडून या ठिकाणी आमदार माणिकराव कोकाटे यांना देऊन त्यांना निडणुकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेसने योगदान दिले.परंतु फारशी सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्यामुळे सिन्नरची जागा ही काँग्रेसची हक्काची जागा असून ती काँग्रेस ला मिळावी असा ठराव करण्यात आला. या बैठकीत संभाव्य विधानसभा उमेदवार बदल चर्चा झाली. विनायक सांगळे यांनी उमेदवारी करावी असे मत सगळयानी मांडले. परंतु विनायक सांगळे यांनी अशी भूमिका मांडली सिन्नर विधानसभेची जागा प्रदेशाकाँग्रेस ने महाविकास आघाडीत काँग्रेससाठी सोडवावी व सिन्नर विधानसभा मतदारसंगातून राज्याचे प्रमुख व देशाचे काँग्रेसचे प्रमुख नेते राज्याचे काँग्रेस विधी मंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मधून विधानसभा लढविण्याऐवजी सिन्नर मधून विधानसभा लढवावी व सिन्नर विधानसभा उमेदवारी संबधी सर्व अधिकार थोरात यांना देण्यात यावे असा ठराव करून प्रदेश काँग्रेसला कळवावा.
येत्या लोकसभेसाठी तालुका काँग्रेस नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस जणांनी जी मोलाची साथ देऊन महाविकास आघाडीचे सर्वांचे लाडके उमेदवार जनसेवक राजाभाऊ यांना निवडूनआणण्यासाठी खूप मेहनत घेतली त्या सर्वांचे अभिनंदन व आभार ठराव करण्यात आला त्याचप्रमाणे नाशिक लोकसभेसाठी निवडून आलेले राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवल्या बद्दल तसेच शोभा बच्छाव यांनी धुळे लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल त्यांचाही अभिनंदन ठराव करण्यात आला. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून गौरव राजाराम पानगव्हाणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व अभिनंदन याचा ठराव करण्यात आला. येत्या काळातील विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना विशेष करून बूथ कमिटीचे काम पूर्ण करण्यात यावे असे ठरवण्यात आले.राज्यातील शेतकरी हा संकटात असून राज्य सरकारने संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे असाही ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. यावेळी सिन्नर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब ,जिल्हा युवक चे अध्यक्ष गौरव दादा पानगव्हाणे ,उदय जाधव ,अश्फाक शेख ,दिनेश चोथवे ,बाळासाहेब गोरडे ,संतोष जोशी ,तालुका अल्पसंख्यांकाचे अध्यक्ष झाकीरभाई शेख ,तालुका युवक चे अध्यक्ष तेजस आव्हाड ,शहर युवक चे अध्यक्ष जयदीप देशमुख ,मंगेश काकड, रोशन वाघ ,वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉक्टर आनंदा सानप ,मनोज कपूर ,भावेश शिंदे ,हेमंत क्षीरसागर ,सुनील सोनवणे,शबीर शेख, अंबादास भालेराव, गोरख साळवे, भीमसेन साळवे, नवनाथ साळवे, रोशन वाघ, अतुल डुंबरे,डॉ. नवनाथ चव्हाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.