नदीवरील दगडी पुल तोडल्याने पिंडदानाची कसरत
नदीवरील दगडी पुल तोडल्याने पिंडदानाची कसरत
वणी प्रतिनिधी
वणी येथील तिळेश्वर महादेव मंदिरात जवळील नदीवरील ऐतिहासिक काळापासून असलेला दगडी पुल तोडल्याने या ठिकाणी होत असलेल्या दशक्रिया विधीत पिंडदाना साठी नातेवाईकांना गुडघाभर नदीच्या पाण्यातून कसरत करत काही विधी उरकावे लागत आहे.दोन दिवसा पासुन परिसरात पाऊस सुरू आहे.नदीनाल्यांना काही प्रमाणात पुर आला असून नदीच्या पाण्याची पातळी नेहमी पेक्षा जास्त आहे.अश्यातच वयस्क अबाल वृद्ध यांना पाण्यातून जाऊन विधी केले गेले.वणी येथील शिवाजी पैठणे यांच्या दशक्रिया विधी दि.२५जुलै रोजी देवनदी तीरावर होता यावेळी अनेक लोक उपस्थित होते.नदीवरील दशक्रिया झाल्या नंतर पिंडदान करण्यासाठी पलीकडे जावे लागत होते त्या दरम्यान काहीना पाण्यातील दगड गोट्यांचा अंदाज न आल्याने पडले तसेच काही जणांच्या पायात काटे घुसले त्या नदीच्या पाण्यात अचानक वाढ होती की काय ही भिती यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.काही दिवसा पुर्वी ठेकेदाराने नविन पुल बांधण्यात येत असतांना या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक दगडी पुलाची अडचण नसुन ही बुध्दीपुरस्कर पाडल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहेच त्या बाबत तहसीलदार वणी ग्रामविकास अधिकारी तलाठी यांना ग्रामस्थांनी तक्रार दिली असून कोणतीच कारवाई होतांना दिसत नाही.२५०वर्षांची परंपरा असलेला पुल पाडणा-या ठेकेदाराला प्रशासन पाठीशी घालतांना दिसत आहे.या बाबत कोणीच गंभीर नाही.तलाठी यांनी आपला रिपोर्ट बनवतांना पुल तोडताना कोणी पाहिला नाही कोणी व्यक्ती आढळून आली नाही असा दिला.पुलाचे काम सुरू करतांना नदीत खोदकाम करतांना त्याची माहिती नसावी का अनेक प्रश्न आहेत परंतु यामुळे होणारी अडचण मोठी आहे.पुढच्या काही दिवसात श्रावण महिना सुरू होत आहे नदीच्या पलीकडे असलेल्या मंदिर जाण्यासाठी असलेला दगडी पुल तोडल्याने महिला भाविकांची मोठी अडचण निर्माण होणर आहे.ठेकेदाराला अनेक वेळा ग्रामपंचायत किंवा तत्सम अधिका-यांनी फोन केले परंतु कोणालाच जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे येत्या पुढच्या आठवड्यात वणी ग्रामस्थ व पत्रकार यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
*चौकट-*
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मृत्युनंतर दहा दिवस आत्मा पृथ्वीतलावर वास करतो. दहावा विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा तृप्त न झाल्यास त्याला मुक्ति मिळत नाही. इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास मुक्ति मिळते, कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो अशी धारणा आहे. परंतु कधीकधी कावळा शिवत नाही अशा वेळेस ब्राह्मण दर्भाचा कावळा स्पर्श पिंडाला करून कावळा शिवला असे मानतात.
——-
*प्रतिक्रीया*‘वणी येथील ऐतिहासिक दगडी पुल पाडल्याने नदीच्या पाण्यातून वाट काढत मंदिरात किंवा पिंडदान करायला जावे लागते तसेच नदीला पुर आल्यावर जाता येत नाही.प्रशासकिय यंत्रणेस अर्ज देऊन ही त्याचे गांभीर्य नाही.ठेकेदाराकडून मनमानी पणाने पुड पाडला असुन त्याची मगरमी वेगळीच तलाठी ग्रामविकास अधिकारी यांना तक्रार अर्ज प्राप्त होऊन ही वेळ काढुन पणा करत आहे.प्रशासकिय यंत्रणा थंड असुन या बाबीचा गांभीर्य नाही.”
-दिगंबर पाटोळे वणी“आमच्या आजोबांचे दशक्रिया विधी कार्यक्रम वणी देवनदी तीरावर होता.दशक्रिया विधी आटोपल्या नंतर पिंडदान करतांना मोठी कसरत करावी लागली.येथील दगडी पुल तोडल्याने नातेवाईकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत नदी पलीकडे पिंडाचा घास ठेवण्यासाठी जातांना घरातील महिला वयस्कर व्यक्ती जावे लागले तसेच दोघे जण पाय घसरून पडले तर एकाच्या पायात काटा घुसला ही अतिशय वाईट बाब आहे.झोपलेले प्रशासन जागे होईल का असा प्रश्न पडला आहे.”
-नामदेव पैठणे,वणी