जनसेवा सेवाभावी संस्थेतर्फे डॉ. गेहलोद यांचा सत्कार ; विदयार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
जनसेवा सेवाभावी संस्थेतर्फे डॉ. गेहलोद यांचा सत्कार ; विदयार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
सिन्नर प्रतिनिधी
ठाणगाव पंचक्रोशी मध्ये पाच दशक रुग्ण सेवा करणारे, डॉ धर्मराज सिंग गहिलोद ,यांचा जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी ठाणगाव जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना जनसेवा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून व डॉ गहिलोद यांच्या आर्थिक सहकार्यातून स्कूल बॅग देण्यात आल्या. जनसेवेचे अध्यक्ष रामदास भोर यांच्या अध्यक्षेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी आपल्या मनोगतात रामदास भोर म्हणाले , डॉ धर्मराज सिंग गहिलोद ,यांनी आपले छोटेसे क्लिनिक चालू केले .ग्रामीण भागात ते 1974 ते 2024 अविरत आरोग्य सेवा करीत आहेत.या सत्काराला उत्तर देताना डॉ.गेहलोद म्हणाले , जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने माझा सरकार केल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो.गेली पन्नास वर्ष ५० किमी खेड्या पाड्यावर पायपिट करून दिवस रात्र रुग्णाची सेवा केली ,त्याचे या सत्काराने सार्थक झाले.
आशापुरचे माजी सरपंच विष्णुपंत पाटोळे यांनी डॉक्टरांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले , ग्रामीण भागात गेल्या पाच दशकापासून डॉक्टरांची आरोग्य सेवा सुरू आहे.आज डॉक्टरांची मुलं डॉ शैलेश व डॉ राहुल सुद्धा वैद्यकीय शिबीर वेळोवेळी राबवतात. महिन्याचा दुसरा व चौथा शुक्रवार हे आठवड्यातील दोन दिवस वेळ काढून ठाणगाव येथे वैद्यकीय सेवा पुरवणार आहेत . सेवेमध्ये उच्चपदस्थ वैद्यकीय सेवा निभावत आहेत.यावेळी, डॉ धर्मराज सिंग गहिलोद यांचा सत्कार करताना, जनसेवेचे अध्यक्ष रामदास भोर, जनसेवेचे सदस्य, गणेश शिंदे पाटील, ग्रामपंचायत सदस्य मोहन आव्हाड, जनसेवा सदस्य सचिन रायजादे, आशापुरची माजी सरपंच, विष्णुपंत पाटोळे, जनसेवेचे सदस्य स्वप्निल आमले, सागर भोर, भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष प्रमोद शिंदे, रिटायर पोलीस अधिकारी भाऊसाहेब काकड, वाळिबा गुंड, मोहन काकड, जिल्हा परिषद शाळा शिक्षक, शिवाजीराव वाघमारे, संतोष सदगीर सर, समीर आरोटे सर, भाऊसाहेब गुंड, कचरू काकड, बाळासाहेब शिंदे, बाळक जाधव, अनिल जाधव, सुनील गोसावी, भगवान जाधव, रंगनाथ जाधव, मोठ्या संख्येने जनसेवेचे सदस्य हजर होते.