पंचशील नगर खुनाचे गुन्हयातील आरोपी भद्रकाली पोलीसांच्या ताब्यात
पंचशील नगर खुनाचे गुन्हयातील आरोपी भद्रकाली पोलीसांच्या ताब्यात
नाशिक प्रतिनिधी
दि. ०५/०७/२०२४ रोजी पहाटे ०३:३० वा. चे सुमारास मयत पांडुरंग उर्फ पांडया हनुमान शिंगाडे हा त्याच्या, पंचशील नगर मधील घरात झोपलेला असताना अज्ञात इसमांनी त्याचा खून केल्याची तक्रार भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल झाली होती .त्या खुनाचा तपास यशस्वीपणे करीत भद्रकाली पोलिसांनी पंचशील नगर मध्येच राहणारा कैलास नंदू गायकवाड या संशयितासह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. कैलास गायकवाड व त्याचे दोन साथीदारांनी कोयता व चॉपरने त्याचे डोक्यावर, छातीवर व बरगडीजवळ वार करून जिवे ठार मारले बाबत मयताचा भाऊ विकास हनुमंत शिंगाडे याने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुहा रजि. नं. २३१/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम १०३ (१), ३(५), ३५१ (२) (३) अन्वये दि.०५/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल आहे.सातपूर परिसरातून हे संशयित ताब्यात घेतले.
त किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस
आयुक्त, सरकारवाडा विभाग, गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष नरूटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श
विक्रम मोहीते, पोलीस निरीक्षक, (प्रशा.) भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शना नुसार गुन्हे शोध पथकाचे
सपोनि वसंत पवार यांचे अधिपत्याखाली कार्यरत असलेले गुन्हे प्रकटीकरण पथक असे गुन्हा घडल्यापासुन गुप्त बातमीदारांचे मार्फतीने व तांत्रिक पध्दतीने सदर गुन्हयातील आरोपीतांचा कसोशीने तपास करीत असतांना सदर आरोपी हे सातपुर परीसरात असल्याबाबत गुन्हे शोध पथकाचे पोहवा कयुम सैय्यद व पोना अविनाश जुद्रे यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सपोनि/वसंत पवार व पथक अशांनी सातपुर परीसरात जावुन सदर आरोपीतांचा शोध घेतला असता आरोपी नामे कैलास नंदु गायकवाड रा. पंचशील नगर, भद्रकाली, नाशिक व एक विधी संघर्षित बालक असे दोघे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेकडे केलेल्या तपासा दरम्यान त्यांचेत असलेल्या जुन्या वादाचे कारणावरून मयत पांडुरंग शिंगाडे यास जिवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच गुन्हयातील तिसरा आरोपी ऋतिक उर्फ लाड्या रामदास गायकवाड, वय २१ वर्षे, रा. पंचशील नगर, नाशिक यास गुंडा विरोधी पथक, नाशिक शहरचे सपोनि ज्ञानेश्वर मोहीते व पथकाने ध्रुवनगर, गंगापुर परीसरातुन ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शोध पथकाचे सपोनि वसंत पवार, सपोउनि यशवंत गांगुर्डे, पोहवा नरेंद्र जाधव, पोहवा सतिष साळुंके, पोहवा संदीप शेळके, पोहवा कव्युम सैय्यद, पोना अविनाश जुद्रे, पोना लक्ष्मण ठेपणे, पोना महेश बोरसे, पोशि निलेश विखे, पोशि दयानंद सोनवणे, पोशि नारायण गवळी, पोशि गुरू गांगुर्डे, पोशि योगेश माळी, पोशि जावेद शेख, पोशि सुरज पगारे तसेच गुंडा विरोधी पथकाचे सपोनि ज्ञानेश्वर मोहीते, पोहवा विजयकुमार सुर्यवंशी, पोना प्रदीप ठाकरे, पोशि गणेश भागवत, पोशि अक्षय गांगुर्डे व पोशि प्रविण चव्हाण यांच्या पथकाने पार पाडली आहे.