महायुतीच्या उमेदवारीसाठी दिनकर पाटील हेच योग्य कार्यकर्त्यांचा दिनकर पाटील यांच्या नावासाठी पुन्हा आग्रह
महायुतीच्या उमेदवारीसाठी दिनकर पाटील हेच योग्य
कार्यकर्त्यांचा दिनकर पाटील यांच्या नावासाठी पुन्हा आग्रह
कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाला पाठवले पत्र
नाशिक प्रतिनिधी
संपुर्ण देशभर २०२४ लोकसभेच्या निवडणूका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरीही नाशिक लोकसभेचा उमेदवार महायुतीकडुन जाहिर होत नाही ही शोकांतीका आहे आघाडीचा उमेदवार जाहिर होऊन जवळ जवळ एक महिना झाला आहे प्रचारही चालू आहे. मात्र महायुती शांत आहे आता निवडणुकीला २० दिवस बाकी आहेत आणि या २० दिवसात नाशिक लोकसभेतील जनतेपर्यंत पोहचनारा महायुतीचा उमेदवार कोण? असा प्रश्न महायुतीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.या पार्श्व भूमीवर सर्वांच्या संपर्कात असलेले दिनकर पाटील यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावल्याचे वृत्त आहे. गेल्या १० वर्षापासून म्हणजे २०१४ पासून दिनकर पाटील हे नाशिक लोकसभा मतदार क्षेत्रात भटकंती करीत असल्याचे त्यांचा घराघरात संपर्क असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. ते जर महायुतीचे उमेदवार असतील तरच महाविकास आघाडीचा उमेदवाराची घोडदौड आज थांबू शकते असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे..
नाशिक शहरात भाजपाचे तीन आमदार नाशिक शहरात ६६ नगरसेवक त्रंबकेश्वरला २० नगरसेवक देवळाली कॅम्प ६ नगरसेवक इगतपूरी सिन्नर प्रत्येकी ५५- ६६ नगरसेवक एवढी ताकद आणी दिनकर पाटील यांची महानुभव पंथातील त्यांच गणगोत वारकरी पंथ अध्यात्माची मत त्यांचे काम बघितल्यास एवढ प्रबळ दावेदार उमेदवार कोणी नाही म्हणून दिनकर धर्माजी पाटील यानांच महायुतीने उमेदवारी दयावी विजय निश्चित होणार ही खात्री कार्यकर्त्यांनी दिली आहे. नाशिकचा खऱ्या अर्थाने विकास करायचा आहे. संसदमध्ये बोलणारा आमची बाजू मांडणारा खासदार पाहीजे या साठी आम्ही दिनकर धर्माजी पाटील यांची मागणी करत आहोत . असे या पत्रात म्हटले आहे.
सोमनाथ मुरलीधर भिसे सिन्नर ,हिरामण रामभाऊ ढिकले सिध्द पिंपरी , रामदास केरू चव्हाण दुडगांव ता.नाशिक, मधुकर गणपत खांडबहाले महीरावनी ता जि नाशिक मोतिराम येशवल गोराळे मु. पो. महीरावनी,शुभम हिरामण पगार तळेगाव ,नवनाथ महादू कोठुळे पेंगलवाडी,संपत भिका बोडके तळवाडे,पुरुषोत्तम बाळासाहेब लोहगावकर त्रंबकेश्वर,आदिवासी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग भिकाजी कोरडे अशा असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र पाठवून साकडे घातले आहे.