चंद्रपूरच्या सैनिकी शाळेच्या प्रवेशासाठी अथर्व खताळे याची निवड ……
चंद्रपूरच्या सैनिकी शाळेच्या प्रवेशासाठी अथर्व खताळे याची निवड ……
सिन्नर ( प्रतिनिधी)
तालुक्यातील पाटोळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाचवीचा विद्यार्थी अथर्व उत्तम खताळे याने अथक परिश्रम व जिद्दीने अभ्यास करून सातारा येथील सैनिकी शाळेत इयत्ता सहावीत प्रवेश मिळविला. त्याने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत ३०० पैकी २५६( ८५ टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण झाला. मराठी माध्यमातील विद्यार्थी सुध्दा उत्तम गुण मिळवून आपले ध्येय पूर्ण करू शकतो याचा वस्तुपाठ जणू अथर्व याने घालून दिला.महाराष्ट्रात सातारा व चंद्रपूर या दोनच ठिकाणी सनिकी शाळा आहेत. यावेळी प्रवेश परीक्षेसाठी भारतातील सुमारे एक लाख पन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. अतिशय कठीण असलेली प्रवेश परीक्षा अथर्वने मोठ्या मेहनतीने व कष्टाने उत्तीर्ण करून घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.तळेगाव दाभाडे येथील सैनिकी शाळेचे शिक्षक गजानन गोरे, पाटोळे येथील प्रा.शाळेचे मुख्याध्यापक विजय निरगुडे,कैलास पवार तसेच त्याचे वडील कवी उत्तम खताळे यांचे मार्गदर्शन लाभले.