आदिवासी समाज शिष्टमंडळ अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या भेटीला भेटीमध्ये सकारात्मक चर्चा- लकीभाऊ जाधव (आदिवासी नेते)
आदिवासी समाज शिष्टमंडळ अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या भेटीला भेटीमध्ये सकारात्मक चर्चा- लकीभाऊ जाधव (आदिवासी नेते)
जालना प्रतिनिधी
मानोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी वेळोवेळी धनगर समाजाच्या आंदोलनात सहभागी होऊन त्याना हक्काचे आरक्षण म्हणजेच एसटी मधून जी धनगर समाजाची मागणी आहे ती मिळावी अशी भूमिका सातत्याने घेतली होती. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड नाराजी निर्माण होत असल्याने आज आदिवासी समाजाचे एक शिष्टमंडळ घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावामध्ये सुरू असलेल्या उपोषण स्थळी जाऊन त्यांची भेट घेत दोन्ही समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सविस्तर माहिती देऊन चर्चा केली यामध्ये ही न्यायालयीन लढाई दोन्ही सामाज्याकडनं लढत आहोत आज मी तिला धनगर समाजाला एनटी मधून आरक्षण आहे एक प्रवर्गात आरक्षण असताना दुसऱ्या प्रवर्गातून आरक्षण घेता येत नाही आणि तसा कुठे कायदा सुद्धा नाही म्हणून धनगर समाज जी मागणी करतो आहे ती आदिवासी समाजावर अन्यायकारक आहे आणि त्यामध्ये मराठा समाजाच्या नेते म्हणून आपण आत्तापर्यंत जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेबाबत आम्ही कायम मराठा समाजासोबत आहोत म्हणून तुम्ही कुठल्या एक समाजाची बाजू न घेता या महाराष्ट्रात आदिवासी समाज हा मागास समाज असून त्या समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे तसेच धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या एसटी प्रवर्गात कधीही आरक्षण मिळू शकत नाही त्या संदर्भात सर्व पुरावे त्यांना सादर केले तेव्हा त्यांच्याही लक्षात आले व त्यांनी यावेळी शब्द दिला की आज पासून धनगर आणि आदिवासी आरक्षणाच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठलेही वक्तव्य करणार नाही आणि कुठल्या एका समाजावर अन्याय होईल अशी माझी भूमिका यापुढे राहणार नाही आदिवासी समाजाच्या भावना दुखावतील किंवा त्या समाजावर अन्याय होईल किंवा त्यांच्या भावना दुखावतील असे वक्तव्य यापुढे संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय करणार नाही आणि उपोषण संपल्यावर लवकरच आदिवासी समाजातील सर्व ज्येष्ठ नेत्यांसोबत या विषयावर मिटींग करुन आदिवासी बांधवांचा गैरसमज दूर करेल असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितले त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला पाठिंब दिला व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आदिवासी समाज तुमच्या लढाईत सोबत राहील असा शब्द व जाहीर पाठिंबा आदिवासी समाजाच्या वतीने त्यांच्या सुरू असलेल्या आंतरवाली सराटी सुरू असलेल्या उपोषणाला दिला.मराठा समाजाच्या न्यायिक मागणीसाठी लढत असताना आदिवासी समाज सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत प्रामाणिकपणे मराठा समाजासोबत या लढ्यात सहभागी राहील. सकारात्मक चर्चा झाल्याने यापुढे दोन्ही समाजातील गाव खेड्यावरचे प्रेमाचे संबंध आणखी घट्ट होतील ही या भेटीची खरी सकारात्मक पावले आज पडली.त्याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश युवा अध्यक्ष इंजी गणेश गवळी,आदिवासी गायक पै संदीप गवारी ,अंकुश कामडी,दादासाहेब बुधर,जीवन भोये,निलेश माळी,दत्ता खराटे,श्याम हिले,सलमान केकरे,ईश्वर पाडवी,सुभाष पावरा,सुरेंद्र बुधर व आदी पदाधिकारी उपस्तीत होते