ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वणीतील अल्पवयीन तरुणीसह तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या;  का संपवली जीवन यात्रा?


वणीतील अल्पवयीन तरुणीसह तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या;

 का संपवली जीवन यात्रा?

वणी प्रतिनिधी 

Advertisement

दिंडोरी तालुक्यातील वणी बस स्थानकच्या पाठीमागील बाजूस नदीच्या काठी झाडाला वीस वर्षाचा तरुण आणि अल्पवयीन मुलीने ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याची घटना घडली आहे सदर घटनेची माहिती वणी पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर वणी पोलीस स्टेशनचे प्रभारी एपीआय सुनील पाटील हे स्वतः व पीएसआय श्रीमती पवार व गोपनीयचे निलेश सावकार यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन झाडाला अडकलेले दोन्ही मृतदेह ग्रामस्थ व वणी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने जमिनीवर उतरून त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणल्याची माहिती एपीआय सुनील पाटील यांनी दिली आहे.सदर मुलगा आणि अल्पवयीन मुलगी दोघेही काठरा दिगर येथील राहणारे असल्याची प्राथमिक माहिती एपीआय सुनील पाटील यांनी दिली आहे .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *