अनुराधा अतुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
अनुराधा अतुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी
जनसेवा कार्यात स्वतःला झोकून देऊन, समर्पित भावनेने कार्य करण्याचा वसा घेतलेल्या अनुराधा अतुल चव्हाण यांचा 15 सप्टेंबर रोजी वाढदिवस. सालाबाद प्रमाणे यंदाचा वाढदिवस देखील अशाच लोकोपयोगी कार्यासाठी या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्तीने समर्पित केला आहे.
महिला आणि मुलींच्या सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न ओळखून सर्वांच्या सहकार्याने फुलंब्री मतदार संघातील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम यंदाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हाती घेतला आहे.
त्यांच्या प्रत्येक सकारात्मक कार्याला आपल्या सर्वांचे पाठबळ आणि आशीर्वाद कायमच लाभत आले आहेत. या कार्यातही आपले आशीर्वाद अत्यंत महत्त्वपूर्ण असून या अभिष्टचिंतन सोहळ्याला आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती. आपली प्रेरणादायी उपस्थिती ताईंच्या आनंदात विशेष भर घालणारी असेल.
दिनांक : १५ सप्टेंबर २०२४ । वेळ : सायं. ४:००
स्थळ : ईडन गार्डन लॉन्स, मुकुंदवाडी, छ. संभाजीनगर येथे संपन्न होणाऱ्या या सामाजिक सोहळ्यात सामाजिक बांधिलकीची जाण असलेल्या प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आवाहन,सौ. अनुराधाताई चव्हाण वाढदिवस संयोजन समितीने केले आहे.