सिन्नर विधानसभेच्या मतदार याद्यांचे शुद्धीकरण करा ; शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
सिन्नर विधानसभेच्या मतदार याद्यांचे शुद्धीकरण करा ;
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
सिन्नर प्रतिनिधी
निवडणूक प्रक्रिया पार पाडणाऱ्या यंत्रणेने मतदार याद्या निष्पक्षपणे पार पाडणे अपेक्षित असतांना संबंधित यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर संशयाचे मळभ दाटुन येत असेल तर ते योग्य नाही.संशयाचे हे मळभ दूर करण्यासाठी वस्तूनिष्ठ माहिती घेऊन मतदार याद्यांचे शुद्धीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली आहे.
सिन्नर विधानसभा क्षेत्राची गेल्या २०१९ ची पंचवार्षिक निवडणूक बोगस मतदानाच्या आरोप प्रत्यारोपाने गाजली होती..या परिस्थितीत ऊदय सांगळे यांनी मतदार यादीमधील निर्माण होणारा गोंधळ व संशय उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.संबंधित यंत्रणेने निष्पक्ष पध्दतीने काम करून मतदार याद्यांचे शुध्दीकरण करण्यात यावे.अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
“घटनात्मक अधिष्ठान असलेल्या निवडणुक शाखेने सिन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या बाबत संशयाचे मळभ दाटुन येणे…हे लोकशाहीच्या दृष्टीने खचितच योग्य नसल्याने मतदार यांद्याचे वस्तुनिष्ठ माहिती घेऊन शुध्दीकरण करावे.”
-नामदेव कोतवाल,
सिन्नर