ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदवड देवळा मतदार संघातील विद्यमान आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान


चांदवड देवळा मतदार संघातील विद्यमान आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान

चांदवड प्रतिनिधी

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकार क्षेत्रातील सर्वच डिजिटल मीडिया व प्रिंट मीडिया च्या प्रतिनिधींना आमंत्रित करून चांदवड देवळा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सर्व पत्रकारांचा गुणगौरव व सन्मान केला..

Advertisement

गेल्या कित्येक वर्षांपासून समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचे आकलन करून आपल्या पत्रकारितेतून समाजाला व शासनाला वेळोवेळी माहिती देणाऱ्या सर्वच पत्रकारांचे यावेळी आभार मानत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी. उपस्थित पत्रकारांच्या काही अडचणी असेल तर सांगा असे म्हटल्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून चांदवड तालुक्याला पत्रकार भवन करण्याची मागणी असून यावेळी आमदार साहेबांनी पूर्ण करावी अशी पत्रकारांनी मागणी करतात आमदार राहुल आहेर यांनी तात्काळ चांदवड नगरपरिषद चे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांना सांगून चांदवड नगर परिषद हद्दीतील योग्य जागा निवड करून कागदपत्र करण्याचे सांगितले..

तसेच येणाऱ्या नवीन वर्षाच्या पत्रकार दिनाच्या वेळी नवीन पत्रकार भवन मध्येच कार्यक्रम घेणार अशी ग्वाही दिली. चांदवडची माजी नगराध्यक्ष भूषण जयचंद कासलीवाल, तालुकाप्रमुख मनोज शिंदे, पंकज खताळ मोहन शर्मा, बाळासाहेब वाघ, व सर्व पत्रकार बंधू तसेच मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *