अन्न व औषध प्रशासनाची दोन गुटखा विक्रेत्यावर धाड; लाखोंचा गुटखा जप्त
अन्न व औषध प्रशासनाची दोन गुटखा विक्रेत्यावर धाड;
लाखोंचा गुटखा जप्त
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
…………………………………………………………………….,………
नाशिक प्रतिनिधी
अन्न औषध प्रशासनाने जिल्हयातील गुटखा माफियांवर धाड मारून लाखोंचा गुटखा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने भोर टाउनशिप, चुंचाळे शिवार, नाशिक या ठिकाणी पाळत ठेवत धाड टाकली. धाड टाकलेल्या ठिकाणी सागर कोठावदे याचे राहते घरी छापा टाकून शोध घेतला असता त्या घरामध्ये हिरा पानमसाला, विमल पानमसाला, वाह पानमसाला व सुगंधित तंबाखूचा एकूण साठा २६ हजार १५८ किंमतीचा विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळला. तसेच सतिश सोनजे याचे राहते घरात शोध घेतला असता त्याठिकाणी हिरा पानमसाला (महापॅक), रॉयल सुगंधित तंबाखू, राजनिवास सुगंधित पानमसाला, झेडएल ०१ जाफरानी जर्दा, केशरयुक्त विमल पानमसाला व व्ही १ तंबाखूचा एकूण १ लाख २० हजार ८७० इतका महाराष्ट्र राज्यात विक्री, साठवणूक, वितरण, उत्पादनास बंदी असल्याने सदर साठा अन्न सुरक्षा अधिकारीसंदिप तोरणे यांनी पुढील विक्रीस मनाई करुन ताब्यात घेवून त्यामधून विश्लेषणासाठी १६ नमुने घेवून ते अन्न विश्लेषकास विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच विक्रेत्यांविरुध्द सदरचा साठा हा त्यांनी कुठून, कोणाकडून आणला तसेच पुरवठादार तसेच उत्पादक शोधणे कामी अंबड पोलिस स्टेशन येथे फिर्याद तोरणे यांनी दाखल केली.सदरची कारवाई सह आयुक्त (नाशिक विभाग) म.ना. चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली म.मो. सानप, सहायक आयुक्त (अन्न) संदिप तोरणे, सुवर्णा महाजन, गोविंदा गायकवाड व अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) यांच्या पथकाने घेतली. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की, प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणा-या अन्न आस्थापनांची माहिती असल्यास त्यांनी सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, महा.राज्य, उदयोगभवन, कक्ष क्र.२१ व २३, ५ वा मजला, सातपूर रोड, नाशिक ४२२००७ किंवा www.foscos.gov.in या संकेत स्थळावर संपर्क साधावा तसेच अन्न व्यावसायिकांनी प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री अथवा साठा करु नये अन्यथा त्यांचेविरुद्ध कारवाई घेण्यात येईल. असा इशारा दिला आहे.