डॉ. कॉऊंट सीझर मॅटी यांच्या जयंती निमित्त अमरावती येथे ११ जानेवारीला मेळावा ; महाराष्ट्रातील इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांना उपस्थितीचे आवाहन
डॉ. कॉऊंट सीझर मॅटी यांच्या जयंती निमित्त अमरावती येथे ११ जानेवारीला मेळावा ;
महाराष्ट्रातील इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांना उपस्थितीचे आवाहन
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
……………………………………………………………………………..
नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सर्व होमिओपॅथी चिकित्सकांनी 11 जानेवारी 2025 रोजी अमरावती येथे होणाऱ्या डॉ.काऊंट सिझर मॅटी यांच्या जयंती समारोहास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ.सतीश जगदाळे,नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. विश्वनाथ सोनवणे, शासकीय कमिटी सदस्य डॉ.एम.एम.पानगव्हाणे यांनी केले आहे.
या जयंती सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांच्या प्रॅक्टिस विषयक सर्व समस्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या हेतुने महाराष्ट्र शासनाने राज्यातील इलेक्ट्रोहोमिओपॅथी व्यवसायिकांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.या निर्णयाबाबत इत्यंभूत सविस्तर माहिती कागदोपत्रासह दिली जाणार आहे.
या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की ,महाराष्ट्र शासनाने 30 ऑक्टोबर 2023 रोजी नेमलेल्या शासकीय समितीने गेले वर्षभर अत्यंत मेहनत करून शासनास अहवाल सादर केला होता. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार शासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा,यासाठी आपण दि.22 जुलै 2024 पासून भर पावसामध्ये आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले होते.
या आंदोलनाची दखल घेत दि.24 जुलै 2024 रोजी मंत्रालयामध्ये,वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाचे तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ तसेच सर्व संबंधित अधिकारी यांची तातडीने बैठक बोलावून समितीने सादर केलेला हा अहवाल शासनाने स्वीकारून तो विधी व न्याय खात्याच्या संमतीसाठी पाठविला होता.
विधी व न्याय विभागाने हा प्रस्ताव स्वीकारून याबाबत इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांना नोंदणी देताना काही नियम व अटी तसेच नोंदणी शुल्क व नोंदणी देण्यासाठीचे प्राधिकरण(कौन्सिल) अशा काही बाबींवर माहिती देण्याची विनंती केली होती.
या सर्व बाबींवर वर्षाच्या सुरुवातीलाच 1 जानेवारी 2024 रोजी शासनाने तातडीने बैठक आयोजित करून सर्व बाबींचा आढावा घेतला, त्यानुसार ही नोंदणी कोणत्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलेल्या इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकास ग्राह्य राहील तसेच ही नोंदणी कशी होणार ? याबाबतची सर्व माहिती या कार्यक्रमात दिली जाणार आहे.मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी (महाराष्ट्र राज्य) ही संघटना गेली तीस वर्षापासून इलेक्ट्रोहोमिओपॅथी व्यावसायिकांच्या हितासाठी अविरतपणे झटत आहे.तब्बल सहा सहा महिन्याची आंदोलने करीत 25 जून 2014 तसेच 22 जानेवारी 2018 रोजी संघटनेने इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांना राज्यात आपला व्यवसाय अधिकृतपणे करता यावा यासाठी शासकीय परिपत्रके काढण्यास सरकारला भाग पाडलेले होते.
परंतु उच्च न्यायालय,सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र शासन आणि स्वतः राज्य शासनाने दोन वेळा परिपत्रके काढून काही अटी आणि शर्तींच्या आधारे इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांना प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली होती. असे असतानाही स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून संबंधितांवर वारंवार बोगस वैद्यकीय व्यावसायिक म्हणुन होणारी बेकायदेशीर कारवाई यापासून संरक्षण मिळण्यासाठी आपणास शासकीय नोंदणीची आवश्यकता होती.
या कार्यक्रमांमध्ये शासकीय समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार असून याबाबतची सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याने शनिवार दि.11 जानेवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह,डॉ.पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज शेजारी,पंचवटी चौक, अमरावती येथे बस,रेल्वे किंवा इतर वाहनांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी,(महाराष्ट्र राज्य) या संघटनेचे विदर्भ अध्यक्ष डॉ.राजू कनेरकर यांनी केलेले आहे.
या समारंभास अनेक मान्यवर खासदार,आमदार तसेच आपले सर्वांचे राज्य व केंद्र स्तरीय मार्गदर्शक व सल्लागार डॉ.बाहुबली शहा,संघटनेचे राज्य अध्यक्ष तसेच शासकीय समितीचे सदस्य डॉ.सतीश जगदाळे,डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. विश्वनाथ सोनवणे,डॉ.माणिक पानगव्हाणे , डॉ विनायक निकम, जयप्रकाश देवरे ,डॉ देवानंद सानप, डॉ राजेंद्र जगताप , डॉ.अनिल देवरे, डॉ. शिरसाट, डॉ. प्रदीप चौधरी, डॉ. कैलास कुटके, डॉ ब्रह्मेच्या, डॉ. सुरेश पाटील.यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.याचप्रमाणे संघटनेचे महाराष्ट्रभरातील शहर, तालुका,जिल्हा अध्यक्ष व राज्याचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.