मागेल त्याला सौर ऊर्जा पंप,योजनेचे नाव मोठे; शासकीय अधिकाऱ्यांचे लक्षण मात्र खोटे; महावितरण देते चित्रीमिरीचा करंट
मागेल त्याला सौर ऊर्जा पंप,योजनेचे नाव मोठे; शासकीय अधिकाऱ्यांचे लक्षण मात्र खोटे;महावितरण देते चित्रीमिरीचा करंट

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
…………………………………………………
हरिभाऊ सोनवणे/नाशिक
शेतकऱ्यांना समृध्द शेती करता यावी, तसेच दिवसभर शेतातील पिकांना पाणी देता यावे.ही शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच मागेल त्याला सौर ऊर्जावर चालणारा कृषी पंप ही अत्यंत चांगली योजना हाती घेतली आहे. शासकीय योजनेचे नाव मोठे परंतु अधिकाऱ्यांचे लक्षण खोटे अशी स्थिती सद्यस्थितीत पाहावयास मिळत आहे.
शासनाने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू केली आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवता येणार आहे त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.
ज्यांच्याकडे पाण्याचे विश्वसनीय स्त्रोत आहेत,परंतु सिंचनासाठी वीज उपलब्ध नाही. अशा शेतकऱ्यांसाठी या योजनेंतर्गत सिंचनासाठी मदत व्हावी म्हणून, सोलर पंप बसवण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना सिंचनाचा अधिकार मिळावा याची खात्री देणारी स्वयंपूर्ण अशी ही योजना आहे.
10% खर्च देऊन शेतकरी सौर पॅनेलचा संपूर्ण संच आणि कृषी पंप मिळवू शकतात.
उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकारे करतात.
जमिनीच्या आकारानुसार 3 ते 7.5 HP पर्यंतचे पंप दिले जात आहेत.
विम्यासह पाच वर्षांच्या दुरुस्तीची हमी समाविष्ट आहे.
यामुळे वीज बिल किंवा वीज कपातीची काळजी करण्याची गरज नाही.सिंचन वापरासाठी दिवसा वीज हमी दिली जाते. 2.5 एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3 हॉर्सपॉवर (HP) पर्यंतचे सौर पंप मिळतील. २.५१ ते ५ एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ५ एचपी पंप मिळणार आहेत. 5 एकरपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 HP पंप मिळणार आहेत. (शेतकरी त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी उर्जा असलेला पंप देखील निवडू शकतात.)
वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिरी, बोअरवेल आणि नद्या किंवा नाल्यांजवळील मालकही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
आतापर्यंत शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी साप विंचू बिबट्या तसेच इतर प्राण्यांच्या दहशती खाली पाणी भरावे लागत असे .महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची वीज रात्री कधी दहा वाजता तर कधी बारा वाजता असा प्रवास करीत होती यातून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत होती .शेतकऱ्यांचे हे दुःख शासकीय यंत्रणेच्या कानापर्यंत गेले आणि यातूनच या योजनेचा जन्म झाला असावा. ही योजना अत्यंत चांगली आहे परंतु योजना राबविणारे अधिकारी रांजलेल्या शेतकऱ्यांकडून देवघेव केल्याशिवाय सर्व्हे करीत नसल्याचे प्रत्यक्ष चित्रच पहावयास मिळत आहे. मागेल त्याला सौर पंप या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर वीज कनेक्शन घेतले आहे त्या वीज कनेक्शनची अडसर यायला नको. शेतकऱ्यांना सक्षम करायचे आहे तर ही अटच टाकायला नको याउलट ज्यांचा अर्ज आला त्यांचा मंजूर करून त्यांना तातडीने पंप उपलब्ध करून देणे ही शासकीय अधिकार्यांचे कर्तव्य आहे परंतु कनेक्शन अथवा शेतातून वीज दिसल्यास अधिकारी चिरेमिरीचा करंटेपणा करीत आहे .ही बाब अत्यंत गंभीर असून तातडीने शासनाने यावर तोडगा काढावा अशी ही जोरदार चर्चा आता शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे
सोलरच्या विजेसाठी शेतकऱ्यांना सर्वेत चिरीमिरीचा करंट:ही योजना पूर्वी मेढा या संस्थेकडे होती परंतु मेढाला योजना डोईजड झाल्याने महा वितरण कंपनीकडे वर्ग करण्यात आली.वीज वितरण कंपनीला योजना रुपी आयतेच कुरण मिळाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.भाजप काळात भ्रष्टाचार रोखला जाईल, अशी अपेक्षा होती.मात्र ही केवळ अपेक्षाच ठरली आहे.महावितरण कडून सोलरच्या विजेसाठी शेतकऱ्यांना सर्वे करतांना चित्रीमिरीचा करंट दिला जात आहे. त्याविषयी अधिक माहिती घेऊ या उद्याच्या भागात… क्रमशः
सोलर कृषी पंप सर्वेच्या नावाखाली शेतकऱ्यांना कोट्यावधीचा गंडा : भाग २ उद्या