क्राईम

‘भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक’ मोहिमेला वकील वर्गाचा पाठिंबा; वसंत गिते यांच्या समर्थनार्थ विविध घटक एकवटले 


‘भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक’ मोहिमेला वकील वर्गाचा पाठिंबा;

वसंत गिते यांच्या समर्थनार्थ विविध घटक एकवटले 

 

 

नाशिक – प्रतिनिधी

मध्य विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांच्या ‘भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक’ या मोहिमेला शहरातील ज्येष्ठ विधिज्ञांनी पाठिंबा दर्शवला आहे. विधानसभा निवडणुकीत श्री. गिते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गिते यांनी बुधवारी जिल्हा न्यायालय आवारातील वकील बार कक्ष, महिला वकील बार कक्ष तसेच विविध चेंबर्सना भेट देत वकीलांच्या भेटी घेत आपल्या उमेदवारीमागील भुमिका स्पष्ट केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत माजी महापौर अँड. यतीन वाघ, सचिन मराठे,

अँड. अभिजीत गोसावी, अँड. जालिंदर ताडगे, अँड. पंकज जाधव, अँड. अजिंक्य गिते, अँड. अतुल सानप, अँड. भुषण टाटिया, अँड. युवराज ठाकरे, अँड. गणेश पाटील, अँड. शिवाजीराव जाधव, अँड. संतोष झाडे, अँड. ललित आंबेकर, अँड. शिवाजीराव शेळके, अँड. विशाल मटाले, अँड. विरेंद्र गोवर्धने, अँड. पांडुरंग तिदमे, अँड. ज्ञानेश्वर मोरे, अँड. युवराज ठाकरे, अँड. सात्विक वाघ आदी उपस्थित होते. शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करताना वकीलांनी श्री. गिते यांच्या ‘भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक’ या मोहिमेचे कौतूक केले. ही मोहिम यशस्वी होण्यासाठी आगामी निवडणुकीसाठी वकीलांनी श्री. गिते यांना पाठिंबा दर्शवला.

Advertisement

तत्पूर्वी श्री. गिते तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गंगापूर रोड परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रारंभी गंगापूर रोडवरील स्वामी समर्थ केंद्रात जाऊन दर्शन घेण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे पदाधिकारी किशोर शिरसाठ तसेच अनिल सोनवणे, संजय दंडगव्हाळ, अँड. पंकज जाधव, अनिल भिडे, नरेश देशमुख, सचिन गुरुळे, बाळासाहेब अहिरराव आदी उपस्थित होते. आकाशवाणी टॉवर, प्रसाद मंगल कार्यालय, नरसिंहनगर, शांतीनिकेतन कॉलनी परिसरातील नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या. याप्रसंगी सुवासिनींनी वसंत गिते यांचे औक्षण केले. नागरिकांनी वसंत गिते यांच्या उमेदवारीचे स्वागत केले असून श्री. गिते हे प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील असा आशावाद व्यक्त केला.

—————————————————-

 

*सत्ताधाऱ्यांनी घरोघरी जॉब नव्हे ड्रग्ज पोहचवले !*

 

जिल्हा न्यायालय आवारात प्रसार माध्यमांशी बोलताना माजी महापौर अँड. यतीन वाघ यांनी वकील वर्गाचा वसंत गिते यांना उत्साहवर्धक पाठिंबा असून गिते यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितलं. अँड. जालिंदर ताडगे यांनी वकीलांचा गिते यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद असून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. शहराच्या उज्जवल भविष्यासाठी वसंत गिते यांना निवडून देण्याचे आवाहनही करण्यात आले.

अँड. अभिजीत गोसावी यांनी राज्यातील सद्य चित्र पहाता लोकशाही धोक्यात असल्याची चिंता व्यक्त केली. राज्यात गलिच्छ राजकारण सुरू असून संविधान पायदळी तुडवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितलं. नाशिकमध्ये गेल्या १० वर्षात एकही नवीन रोजगार आला नसून ड्रग्ज विळखा व गुन्हेगारी वाढली असल्याचे नमूद केले. सत्ताधाऱ्यांनी ड्रग्ज घराघरापर्यंत पोहचवले जॉब मात्र पोहचवले नसल्याचा आरोपही अँड. गोसावी यांनी केला. वकील समाजासाठी दिशादर्शक असतो. त्यामुळे वसंत गिते यांना निवडून देण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितलं. जिल्हा न्यायालयातील वकिलांचा वसंत गिते यांना मोठा प्रतिसाद असल्याचे अँड. अजिंक्य गिते यांनी सांगितलं. ड्रग्जच्या विळख्यातून युवा पिढीला वाचवण्यासाठी गिते यांच्या पाठीशी असल्याचेही अँड. गिते यांनी सांगितलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *