क्राईम

फॅमिली हार्ट सर्जन’ – डॉ. राहुल कैचे यांचा अद्वितीय ठसा; हृदयातून जडले हृदयाशी नाते 


फॅमिली हार्ट सर्जन’ – डॉ. राहुल कैचे यांचा अद्वितीय ठसा;
हृदयातून जडले हृदयाशी नाते 
नाशिक –प्रतिनिधी
 हृदयाच्या शस्त्रक्रियेसारख्या गुंतागुंतीच्या क्षेत्रात, नाशिकचे सुप्रसिद्ध कार्डिओथोरेसिक सर्जन डॉ. राहुल कैचे यांनी एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कार्डियोव्हॅस्क्युलर सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. कैचे यांनी गेल्या काही वर्षांत एकाच कुटुंबातील पती-पत्नी, भाऊ-बहीण, वडील-मुलगा अशा अनेक जोड्यांचे हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.
या अनोख्या कार्यामुळे रुग्णांमध्ये त्यांना प्रेमाने ‘फॅमिली हार्ट सर्जन’ म्हणून ओळखले जाते.
 कौशल्य, करुणा आणि आधुनिकता यांचे त्रिसूत्र:
डॉ. राहुल कैचे यांची शस्त्रक्रिया पद्धती केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर रुग्णकेंद्रित विचारांनी समृद्ध आहे. ते सांगतात, “एका सदस्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली की, कुटुंबातील इतर सदस्यही माझ्यावर विश्वास ठेवून येतात. हा विश्वास मी कायम ठेवण्यासाठी तंत्रज्ञानात सुधारणा आणि वैयक्तिक काळजी यांचा समतोल राखतो.”
विशेषतः, त्यांनी शस्त्रक्रियेत रुग्णाच्या छातीतील शुद्ध रक्तवाहिन्यांचा (arteries) वापर करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ब्लॉकेजेसचा धोका कमी होतो, आणि दीर्घकालीन आरोग्य लाभते.
रुग्णांचे अनुभव: विश्वासाचं नातं:
रुग्णांचे अनुभव हेच डॉ. कैचेंच्या कार्याची खरी ओळख आहेत. एक रुग्ण सांगतात, “शस्त्रक्रियेनंतरच्या काळात त्यांनी जे सहकार्य दिलं, तेच मला नवीन उभारी देणारं ठरलं.” तर दुसरे रुग्ण म्हणतात, “फक्त शस्त्रक्रिया नव्हे, तर त्यांच्या बोलण्यातून आत्मविश्वास मिळतो. आणि म्हणूनच मी आणि माझं कुटुंब आजही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आहे.”
आकड्यांमध्ये यश:
सह्याद्रि हॉस्पिटलचे उपाध्यक्ष संजय चावला सांगतात, “आजवर डॉ. राहुल कैचे यांनी १२,५०० हून अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या असून, यशाचा दर ९९.५६% आहे.” हे प्रमाण त्यांच्या उत्कृष्ट कौशल्याचे आणि निष्ठेचे द्योतक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *