नासिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेच्या विद्यार्थ्यांचा मर्डर करण्याची योजना आखली आहे का? – चंदन पवार यांचा खणखणीत सवाल
नासिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेच्या विद्यार्थ्यांचा मर्डर करण्याची योजना आखली आहे का? – चंदन पवार यांचा खणखणीत सवाल
नाशिक प्रतिनिधी
नासिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेच्या विद्यार्थ्यांचा मर्डर करण्याची योजना आखली आहे का? असा सवाल चंदन पवार यांनी उपस्थित केला आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने 4 डिसेंबर 2024 रोजी सर्व शाळांसाठी एक आदेश काढला आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की शाळा आणि कॉलेज मधून जाणाऱ्या सहली ह्या फक्त एसटी महामंडळाच्या बसमधूनच काढल्या जातील, शाळेच्या स्कूल बस किंवा खाजगी बस वापरू नये असा एक प्रकारे दमच शाळेच्या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी यांनी दिला आहे.
या विषयी पवार यांनी महानगरपालिका प्रशासन आणि परिवहन महामंडळ अधिकाऱ्यांना प्रश्न केला आहे की, महामंडळाच्या कोणत्या बसेस हया सुस्थितीत आहेत? याची प्रथम यादी मागवावी, कारण महामंडळाच्या अर्ध्यापेक्षा जास्त बसेसचा आज इन्शुरन्स संपलेला आहे, पीयूसी सर्टिफिकेट तसेच अनेक बसेसचे फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा नाहीत, असे असतांना हा आदेश कोणत्या लॉजिकने काढला आहे हे समजण्यापलीकडे आहे.आत्ताच 7 डिसेंबर 2024 रोजी मालेगाव तालुक्यात कंक्राळे गावातील दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू एसटी बसचा आपत्कालीन दरवाजामधून खाली पडल्याने झाल्याची घटना घडली आहे.
महामंडळाच्या बसचां दरवाजा उघडून जर मृत्यु होत असेल तर मग महामंडळाच्या बसेस सहलीसाठी घेऊन जाण्याचा आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांनी बसची गॅरंटी घेवून लेखी सांगावे की महामंडळाच्या बस पासून कुणालाही नुकसान होणार नाही,
Advertisement
खरे तर शिक्षण विभागाने आदेशच चुकीच्या पद्धतीचा काढला आहे, त्यांनी आदेश काढताना आधी एसटी महामंडळाकडून माहिती घ्यायला हवी, की महामंडळाच्या किती बसेस या फिटनेस सर्टिफिकेट, पीयूसी आणि इन्शुरन्स सर्टिफिकेट प्राप्त आहेत, अशी माहिती जर शिक्षण विभागाने आधी महामंडळाला विचारली असती तर समजले असते की, कुठेतरी प्रशासन योग्य दिशेने चालले आहे, दिव्याखाली अंधार असलेले महानगरपालिका प्रशासन आणि एसटी महामंडळ यांनी संयुक्त विद्यमाने शाळेच्या विद्यार्थ्यांचा मर्डर करण्याची योजना तर आखली नाही ना असा प्रश्न भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार यांनी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला विचारला आहे.
ज्या बसेस शाळा सहलीसाठी घेऊन जाणार आहे त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट, इन्शुरन्स, पीयूसी, बस ड्रायव्हरचे अनुभव प्रमाणपत्र, लायसन्स या सर्व गोष्टी अद्यावत आहेत की नाहीत हे बघावे, त्यासाठी शाळेकडून सर्व माहिती मागवावी आणि सहलीपूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी या गोष्टीचां समावेश असलेला आदेश काढावा
सरकारी बसेसमुळेच मागील वर्षात अशा अनेक घटना महाराष्ट्रभर घडल्या आहेत ज्यामुळे अनेक निपराध लोकांचा एसटी महामंडळाने बळी घेतलेला आहे, शिक्षण विभाग जर अशा प्रकारे आदेश काढून मुलांच्या मृत्यूला कारणीभूत होत असाल तर सर्व शाळांचे पालक हे रस्त्यावर उतरून महानगरपालिकेचे शिक्षणं विभाग आणि एसटी महामंडळाच्या विरोधात येणाऱ्या काळात आंदोलन करतील, आंधळा दळतो आणि कुत्र पीठ खाते, अशा प्रकारचा भोंगळ कारभाराचा नमुना दिवसेंदिवस बेशिस्त सरकारी विभागाकडून अनुभवास येत आहे, हा बुद्धी गहान ठेवून काढलेला आदेश प्रशासनाने तात्काळ रद्द करून नवीन आदेश काढावा.असेही पवार यांनी म्हटले आहे.