संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा – करण गायकर
संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा – करण गायकर
जालना प्रतिनिधी
छावा क्रांतिवीर सेनेचा सातवा दसरा मेळावा श्रीक्षेत्र राजुर गणपती,ता.भोकरदन,जि.जालना येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडल्यामुळे यावर्षीचा मेळावा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याची सुरुवात सुप्रसिद्ध शिवशाहीर सुरेश जाधव यांच्या दमदार शाहिरीने झाली.उद्घाटन मुंबई मित्र वृत्तपत्र समूहाचे संपादक व कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी भूषविले.व्यासपीठावर प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे,प्रदेश संघटक दिनकर मामा कोतकर,युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ. किरण डोखे,शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश माने,विद्यार्थी आघाडी प्रदेश संपर्कप्रमुख गिरीश आहेर,आयटी प्रदेश संपर्कप्रमुख वैभव दळवी,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हर्षद भोसले,उद्योजक आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण पाटील,नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे,ग्रामीण जिल्हा प्रमुख नवनाथ वैराळ,नांदेड जिल्हा प्रमुख बालाजी ढगे,महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा संगीता ताई सूर्यवंशी,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सविता ताई वाघ मराठवाडा आयटी प्रमुख अविनाश तांदळे उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडी उपाध्यक्ष योगेश पाटील छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रमुख पप्पू बोरुडे पाटील तालुकाध्यक्ष बाबा पाटील चौधरी योगेश गांगुर्डे आबा पाटील गोरख संत भारत पिंगळे नाना पालखेडे करण शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष करण गायकर म्हणाले –
“या देशात बिसलरीच्या पाण्याला भाव मिळतो,पण शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही.पिझ्झा आणि बर्गरचे दर ठरतात,पण माझ्या शेतकऱ्याच्या घामाने उगवलेल्या पिकाला हमीभाव मिळत नाही.योग्य तो मोबदला दिला जात नाही.सरकार कोणाचेही असो,शेतकऱ्याची पिळवणूकच होत आली आहे.आज मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.तोंडाशी आलेली पिके उध्वस्त झाली आहेत.अशा वेळी बळीराजाला मदत करण्याऐवजी राज्यकर्ते फक्त राजकारण करत आहेत. मदतीची आश्वासने दिली जातात,पण प्रत्यक्षात काहीच हातात पडत नाही. बँका सुद्धा शेतकऱ्यांना त्रास देण्यात मागे पुढे बघत नाही आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे बँक अकाउंट होल्ड केलेले आहेत शासनाचे मदत आली तरी ते पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे या जाचकाठी तात्काळ बँकांच्या काढून टाकाव्या अन्यथा बँकांच्या विरोधात सुद्धा आम्हाला मोठे जन आंदोलन करावा हे सर्व प्रश्न विरोधकांनी राज्यभर आंदोलन करून समोर आणले पाहिजे परंतु विरोधकांचीही अवस्था बिकट आहे.त्यांना शेतकऱ्याचे दु:ख दिसत नाही,ते फक्त नको त्या गोष्टींवर राजकारण करत आहेत.शेतकरी जगला तरच राष्ट्र जगेल;पण शरद पवार असो,उद्धव ठाकरे असो,काँग्रेस असो – सगळे शेतकऱ्याच्या भावनांशी खेळ करत आहेत.राज्य सरकारने अधिवेशन घेऊन हेक्टरी किमान ७० हजार रुपये मदत द्यावी.ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी केली पाहिजे.पुढील पाच वर्षे शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना आखल्या पाहिजेत.मुख्यमंत्री संवेदनशील आहेत,आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.दोन्ही उपमुख्यमंत्रीही सोबत उभे राहतील असा विश्वास आहे.पण जर असे झाले नाही तर छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने राज्यभर रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी आक्रमक आंदोलन छेडले जाईल.”
स्थानिक प्रश्नांवर बोलताना गायकर म्हणाले –
“श्रीक्षेत्र राजुर गणपती येथे सेवेकरी महिलांसाठी अजूनही स्वच्छतागृहाची सोय नाही.हा मोठा अपमान आहे.पुढील पंधरा दिवसांत हे काम पूर्ण झाले नाही तर तहसीलदार कार्यालयात समिती अध्यक्षांच्या तोंडाला काळे फासून आंदोलन करू.मंदिर समिती संचालकांनी तात्काळ आश्वासन दिले आहे,पण जर काम झाले नाही तर छावा क्रांतिवीर सेना आक्रमक आंदोलन करेल.”
यानंतर कामगार नेते अभिजीत राणे यांनीही आपल्या भाषणात छावा क्रांतिवीर सेनेला पाठिंबा दर्शविताना म्हटले –
“छावा क्रांतिवीर सेनेने दसरा मेळाव्यात मांडलेल्या सर्व मागण्या मी स्वतःमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांच्यापर्यंत पोहोचवीन.शेतकरी, कामगार,सहकार,आरोग्य,महिला व स्थानिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेईन.श्रीक्षेत्र राजुर गणपतीसारख्या दर्जेदार धार्मिक स्थळी स्वच्छतागृहाचा प्रश्न सुटला नाही तर मीसुद्धा छावा क्रांतिवीर सेनेसह आंदोलनात सहभागी होईन.छावा क्रांतिवीर सेना ही आक्रमक संघटना असून जनतेच्या हक्कांसाठी लढणारी ताकद आहे.या संघटनेने अनेक विधायक कामे केली आहेत.म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी उपस्थित राहून ताकद वाढवितो.या दसरा मेळाव्याला उपस्थित सर्व जनतेचे मी अभिनंदन करतो आणि आपण केलेल्या मागण्यांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन.मी पत्रकार तर आहेच परंतु कामगार नेता सुद्धा आहे महाराष्ट्रातील लाखो कामगारांचे नेतृत्व धडक कामगार युनियन यांच्या माध्यमातून करत असताना आज येथील कामगारांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सुद्धा आक्रमकपणे न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.छावा क्रांतिवीर सेना व धडक कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातील कामगारांना न्याय देण्यासाठी आगामी काळात मोठी चळवळ उभी करणार असल्याचेही यावेळी कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोलून दाखवत दसरा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालना जिल्हा प्रमुख राम पाटील गाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामीण जिल्हा प्रमुख विनोद पुंगळे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील
राम पाटील गाडेकर जिल्हाप्रमुख जालना विनोद पाटील पुंगळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गजानन पाटील ढवळे युवक जिल्हाध्यक्ष महादेव कदम कार्याध्यक्ष मराठवाडा विभाग बंडू पाटील मडके तालुका उपाध्यक्ष बदनापूर ज्ञानेश्वर सुरोशे जिल्हा कार्याध्यक्ष राम पुंगळे उपजिल्हाप्रमुख विद्यार्थी आघाडी अंकुश पुंगळे युवक तालुका उपाध्यक्ष संतोष सावंत तालुका अध्यक्ष भोकरदन यांनी अथक परिश्रम घेतले.