क्राईम

कायद्यासमोर सर्व समान? वरोरा न्यायदंडाधिकारी करणार आदर्श सेट?? अमित शहांविरुद्द गुन्हा दाखल होणार का?


कायद्यासमोर सर्व समान? वरोरा न्यायदंडाधिकारी करणार आदर्श सेट??

 

अमित शहांविरुद्द गुन्हा दाखल होणार का?

 

 

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

मराठी संस्कृती जतन करा 

…………………………………………………………………………..

आपली दुनियादारी स्पेशल रिपोर्ट 

 

कायद्यासमोर सर्व समान आहेत, हा घटनेचा मूळ गाभा ज्याची लाठी उसकी भैस या उक्तीप्रमाणे प्रभावहीन झाला. सत्ताधारी आपल्या मनाप्रमाणे कायद्याची परिभाषा अंमलात आणतात, हा आजवरचा इतिहास आहे. अलीकडच्या काळात ही परिभाषा सत्ताधाऱ्यांसाठी अधिकच अनुकूल बनली आहे. सत्तेत असलेल्या मंडळींना सर्व गुन्हे माफ असाच नवीन अलिखित कायदा अंमलात आणला जात आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा न्यायालयातील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर दाखल झालेला एक खटला विशेष महत्वाचा ठरणार आहे. केंद्रीय गृह मंत्री यांच्या विरोधात हे प्रकरण असल्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष वरोरा न्यायालयाकडे लागले आहे. विशेष म्हणजे वरोरा न्याय दंडाधिकाऱ्यांनी ही याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतल्याने याचिकाकर्त्यासह भारतीय नागरिकांच्या न्यायाप्रती अपेक्षा उंचावल्या आहेत. या प्रकरणाची नैसर्गिक सुनावणी झाली तर न्याय व्यवस्थे वरील विश्वास दृढ होऊन कायद्या समोर सर्व समान यावर खऱ्या अर्थाने शिक्का मोर्तब होईल.

……..

 

अखेर केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या विरुद्ध अट्रासिटीचा कलम-४ नुसार,व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३-चा कलम ६१(२)१९९,२९८,३१६

(५),३१८(४),३३५,३३६

(३),३४०(१),३४०(२),३

(५)कलमानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी वरोरा न्यायायलायचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी आयु. विनोदकुमार कवडूजी खोब्रागडे यांनी सादर केलेली याचिका दाखल करून घेतली असून १०/२०२५- क्रमांकाच्या फौजदारी पीटिशनची दि:-१६-०१-२०२५-ला सुनावणी होणार आहे. एखाद्या केंद्रीय गृहमंत्री या पदावर असलेल्या व्यक्तीवर फौजदारी खटला दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.तब्बल सात दिवस मंथन केल्यानंतर न्याय दंडाधिकाऱ्यांनी ही याचिका दाखल करून घेतली आहे. यामुळे महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली असून त्याचे देशभरात पडसाद उमटतील असा कयास बांधला जातोय.

हे प्रकरण कायद्यापुढे सर्व समान आहेत,आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही, ही फिर्यादीची धारणा आहे.

 

भारत सरकारचे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा म्हणाले की तक्रार दिल्यानंतर तिन दिवसांत पोलिस प्रशासन यांनी अँक्शन घ्यावी, अशा सूचना स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत, तर भारत सरकारचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील तक्रार दिल्यानंतर पोलिस प्रशासन यांनी कारवाई केली नाही तर सबंधित ठाणेदार यांचावरही अँक्शन घ्यावी असे आदेश दिले होते याचा दाखला फिर्यादी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी दिला आहे.चंद्रपूर जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस प्रशासनाने सात दिवस दिवस फिर्यादीच्या तक्रार अर्जावर कुठलीही कार्यवाही केली नाही म्हणून खोब्रागडे यांनी न्यायालयात धाव घेतली.

Advertisement

न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात २६ डिसेंबर २०२४ रोजी अमीत शहा यांच्यासह पो. नि अजिंक्य तांबडे एस डी ओ पी कु.नयोमी दशरथ साठम, पो. अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा चंद्रपूर यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध फौजदारी खटला दाखल केला आहे.त्यानंतर सात दिवस न्यायमूर्ती यांनी प्रकरणाचा अभ्यास केला आणि अभ्यास केला व दि:-०३-०१-२०२५-रोजी केस रजिस्टर केली, त्यावर दि:-१६-०१-२०२५-रोजी सुनावणी आहे.

 

 विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींवर FIR दाखल झाले,केंद्रीय वित्त मंत्री यांच्या वर FIR रजीष्टर झाल्या.अनेक मुख्यमंत्री यांच्या वर FIR दाखल झाले जेल मध्ये गेले,तर केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्यावर पोलिस प्रशासन FIR रजीष्टर का करीत नाही. असा सवाल न्यायालयासमोर उपस्थित केला आहे.

विनोदकुमार खोब्रागडे

याचिका कर्ता

 

कायद्यापुढे सर्व समान आहेत!

दि:-१८-१२-२०२४-आहे रोजी संसद भवन येथे भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा, कायदेपंडित ज्ञानाचे प्रतीक संविधान निर्माते ज्यांच्या संविधानावर या देशाचा कारभार चालतो असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल एकेरी शब्द,आंबेडकर आंबेडकर हे फॅशन आहे असे हातवारे करून, वारं-वार अपशब्द बोलत होते,इतका वेळ देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता असे बेताल वक्तव्य संविधानीक पदावर बसुन बोलत होते व त्यांचा पक्षाचे खासदार हसत होते.

हे सर्व दृष्य लाईव इलेक्ट्रॉनिक मीडिया दाखवत होते. माझ्या सह संपूर्ण देश हे बघत होते,व मन विचलित करीत होते, करोडो करोडो समाज बांधवांचा भावना दुखावल्या आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे “फॅशन” नाही तर “मिशन” आहे.भारतात एकशे चाळीस करोड जनसंख्या असलेल्या देशात सर्व अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चा निषेध निवेदन देऊन लोक चुपचाप बसले

मात्र मी प्रथम पोलिस प्रशासन,महसूल प्रशासन यांना गंभीर तक्रार केली सात दिवस वाट बघितलो व नंतर कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या मा.न्यायालयात अमीत शहा यांच्या वर अट्रासिटीचा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी फौजदारी पीटिशन वरोरा न्यायालयात दाखल केली आहे.

-विनोद खोब्रागडे

 

 

………………..

जनहितार्थ जारी

समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधणीसाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी, संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे व कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय व हक्क मिळवून घ्यावे.

फेक न्युज पासून सावधान राहावे.

…………………

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *