क्राईम

शिव जन्मोत्सवाच्या औचित्यावर ठाणगाव येथे शिव कालीन नाणी, शस्रांचे प्रदर्शन ; नाणी समिती संचालक जोसफ लोपीस शिवकालीन शस्त्र व नाण्यांची, पंचक्रोशीतील शिवप्रेमींना देणार माहिती


शिव जन्मोत्सवाच्या औचित्यावर ठाणगाव येथे शिव कालीन नाणी, शस्रांचे प्रदर्शन;

नाणी समिती संचालक जोसफ लोपीस शिवकालीन शस्त्र व नाण्यांची, पंचक्रोशीतील शिवप्रेमींना देणार माहिती

रश्मी मारवाडी /सिन्नर

Advertisement

ठाणगाव येथील छत्रपती शिवरायांच्या पावन भूमीत छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने जनसेवा सेवाभावी संस्था ठाणगाव आयोजित शिवकालीन ब्रिटिश कालीन शस्त्र नाण्यांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे.दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ठिकाण ठाणगाव मारुती मंदिरामध्ये हे भव्य प्रदर्शन खुले असणार आहे. पंचक्रोशीतील व तालुक्यातील सर्व शिवप्रेमी व ग्रामस्थांनी या ऐतिहासिक दुर्मिळ शस्र पाहण्याची संधी साधावी, असे आवाहन जनसेवा सेवाभावी संस्थेने केले आहे. शिवकालीन शस्त्र तलवार, ढाल भाला, वाघनखी, 40 विविध प्रकारचे शस्त्र आहे पुरातन नाण्यांचे पेशवेकालीन, पोर्तुगीज कालीन नाणी , ब्रिटिश कालीन नाणी पब्लिकन इंडियाचे नाणी या प्रदर्शनात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.  शालेय विद्यार्थ्यांनी प्रदर्शन बघण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनसेवेचे आधारस्तंभ मुकुंद काकड यांनी केले आहे. मुंबई येथील नाणी समिती संचालक जोसफ लोपीस शिवकालीन शस्त्र व नाण्यांची, पंचक्रोशीतील शिवप्रेमींना माहिती देणार आहेत. शिवकालीन शस्त्र व नाण्यांची, या कार्यक्रमाचे आयोजक, जनसेवा आधारस्तंभ, मुकुंद काकड, जनसेवेचे अध्यक्ष रामदास भोर, शिव समर्थ प्रकाशन गड किल्ले इतिहास अभ्यासक अंकुर काळे, जनसेवाचे उपाध्यक्ष, वसंत आव्हाड, , कार्याध्यक्ष बबन दादा काकड, राजेंद्र काकड नाशिक, अमोल काकड ,पांडुरंग भोर, मोहन आव्हाड, सागर भोर, गणेश शिंदे, भगवान शिरसाट, हे या प्रदर्शनासाठी परिश्रम घेत आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *