क्राईम

‘तीने ’ एसटी बसमध्येच दिला बाळाला जन्म; महिला वाहकाच्या तत्पर मदतीने आई बाळ सुखरूप 


‘तीने ’ एसटी बसमध्येच दिला बाळाला जन्म;

महिला वाहकाच्या तत्पर मदतीने आई बाळ सुखरूप 

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

मराठी संस्कृती जतन करा 

……………………………………………………………………………

 

किरण घायदार 

नाशिक 

धावत्या रेल्वेत वा बसमध्ये प्रसुती कळा सुरू होऊन महिला प्रसूत झाल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो. तशाच प्रकारची एक घटना बुधवारी दुपारी नाशिक ते नंदुरबार या एस टी बसमध्ये घडली आहे.

बुधवारी दुपारी नाशिक नंदुरबार हि बस (एम एच 40 वाय 5668) सटाणा दरम्यान प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची प्रसूती झाल्‍याची माहिती एस.टी. चालक-वाहकाने दिली. प्रसुती झालेली महिला आणि बाळ हे सुखरूप असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

Advertisement

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, नाशिक येथून नंदुरबार बसने मोलमजुरी करणारे दाम्पत्य प्रवास करीत होते. बसच्या आदळ-आपटमध्ये अचानक महिलेच्या पोटात दुखू लागले आणि तिला बसमध्येच कळा सुरु झाली.पंचवटी आगारातील वाहक सौ. पीनाताई राठोड यांना घटनेचे गांभीर्य समजताच त्यांनी तात्काळ सर्व प्रवाशांना बस खाली उतरवले.गर्भवती महिलेला  धीर देऊन त्यांनी मदतीचा हात पुढे करून त्या महिलेची सूखरुप प्रसूती केली. महिलेला पुत्ररत्न प्राप्त झाले. इथे न थांबता चालक व वाहक यांनी त्या महिलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करून पुढील कामगिरी करण्यासाठी नंदुरबारकडे मार्गस्थ झाले.

वाहक सौ.पिना राठोड या 2009 मध्ये रा. प. सेवेत रुजू झाल्या आहेत. म्हाडा, सातपूर येथे राहत असून नर्सिंगचा कोर्स केला असल्याचे त्यांनी सांगितले.चालक व वाहकांच्या प्रसंगावधाने आई व बाळ सुखरूप आहे.राठोड यांनी प्रसांगवधान दाखवत वेळेवर महिलेची प्रसूती केली व रुग्णालयात दाखल केले. याबद्दल प्रवाशांनी वाहक राठोड यांचे कौतुक केले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *