क्राईम

जय भवानी, जय शिवाजीच्या निनादाने जयपूरचे रस्ते दणाणले;  राजस्थानच्या राजभवनमध्ये शिव यात्रारथेचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या हस्ते पूजन;  भारत क्रांती मिशनतर्फे जयपूरमध्ये शिव जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा 


जय भवानी, जय शिवाजीच्या निनादाने जयपूरचे रस्ते दणाणले;

राजस्थानच्या राजभवनमध्ये शिव यात्रारथेचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या हस्ते पूजन; 

भारत क्रांती मिशनतर्फे जयपूरमध्ये शिव जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा 

 

 

जयपूर (राजस्थान) : राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत राजभवन येथे भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळ २०२५ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा १३ फूट उंचीचा अश्वरुड पुतळा असलेल्या यात्रारथाचे पूजन करण्यात आले. नाशिक सह महाराष्ट्रातून आलेल्या शिवप्रेमींना राज्यपाल बागडे यांनी राजभवन मध्ये मिठाईचे वाटप केले .यावेळी भारत क्रांती मिशन समिती राष्ट्रीय समन्वयक डॉ विलास भाऊ पांगरकर, किशोर भाऊ चव्हाण, विजय काकडे पाटील, परमेश्वर नलावडे, दत्ता कदम, अशोक खानापुरे, दिपक पाटील, अँड मयूर पांगारकर, सौ छाया पांगरकर, शत्रुघ्न झोंबाड, जगदीश पांगरकर, राजेश घाटे आदिनी राज्यपाल हरिभाऊ बागडे , मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांचे शाल श्रीफळ देत सन्मान केला.

यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिवजयंती निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयपुरात मिरवणूक:

 

जयपूर येथील बडी चौपट, येथुन छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकीची सुरुवात सिंदखेड राजा शिवाजीराजे जाधवराव , करणी सेना महिपाल सिंग मकराणा, भारत क्रांती मिशनचे समन्वयक डॉ विलास पांगरकर, छाया पांगरकर, किशोर चव्हाण, दत्ता कदम, दीपक पाटील , विजय पाटील, जयपूर उत्सव समिती अध्यक्ष सुशील जाधव, शशांक शर्मा, कीर्ति राठोड, विजय साळुंखे, अमोल शेळके , अरविंद पारीके, सचिव विजय साळुंखे, कीर्ती राठोड, अँड शशांक शंर्मा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीची सुरुवात झाली.

Advertisement

ढोल ताशा, बँड पथक, डीजेच्या जल्लोषात मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी महाराष्ट्रातून आलेले शिवप्रेमी व जयपूर येथील मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभाग घेतला होता. डोक्यावर भगवे फेटे परिधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेले छत्रपती शिवाजी महाराज व मावळे घोड्यावर स्वार होऊन या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात येत होते. जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराज की जय अश्या घोषनाणी संपूर्ण परिसर दनादून गेला होता. जयपूर शहरातून बिर्ला ऑटोरीयम येथे मिरवणुकीची सांगता झाली.

 

नवीन पिढीला पराक्रमी वीर महापुरूष याची माहिती झाली पाहिजे : राज्यपाल हरिभाऊ बागडे

 

भारत क्रांती मिशन व शिव जन्मोत्सव समिती जयपुर यांच्या वतीने बिर्ला ऑडिटोरियम हॉल येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष भाषणात राज्यपाल हरिभाऊ बागडे बोलत होते. नवीन पिढीला ह्या विषयी माहिती होणे गरजेची आहे. महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श विचार आचार व्यवहार हा आत्मसात केला पाहिजे असल्याचे सांगीतले. आज पहिल्यांदा जयपूर येथे शिवजयंती साजरी होत आहे. येथून पुढे येथील मराठा बांधवांनी ही जयंती साजरी करण्याचे आवाहन बागडे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत अधिकारी बाबूलाल जी, शिवाजीराजे जाधव शिंदखेड राजा, सुरेश चव्हाणके मुख्य संपादक सुदर्शन न्यूज, राष्ट्रीय समन्वयक डॉ विलास पांगरकर, किशोर चव्हाण, विजय काकडे पाटील, मराठा रामनारायण, परमेश्वर नलावडे, जयपूर शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष सुशील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

राजस्थान राज्यातील जयपूर मध्ये शिवजयंती साजरी होत असल्याचा मनापासून आनंद होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसमावेशक राजे होते. त्यांचे विचार आचरणात आणून जीवन जगण्याचे आवाहन केले . शिवाजीराजे जाधवराव सिंदखेड राजा यांनी केले.

सुदर्शन न्युजचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी मनोगत व्यक्त करतात सागितले की,

प्रयाग मध्ये जसा भक्तीचा कुंभमेळा भरला आहे . तसा जयपूर मध्ये शिवभक्ती देशभक्तीचा कुंभमेळा भरला असल्याचा आनंद आहे .

जयपूर शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष सुशील जाधव यांनी जयपूर येथील शिवजन्मोत्सवाची माहिती दिली. आभार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत अधिकारी बाबूलालजी यांनी केले. सूत्र संचालन अरविंद पारीख यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *