क्राईम

गोरक्षकांवर कसाई टोळक्याचा जीवघेणा हल्ला..! गोवंश हत्या प्रतिबंध असतांना माफिया मुजोर 


 गोरक्षकांवर कसाई टोळक्याचा जीवघेणा हल्ला..!

गोवंश हत्या प्रतिबंध असतांना माफिया मुजोर 

दौंड : प्रतिनिधी

केडगाव दापोडी पथकरनाका या ठिकाणी नुकतेच महिंद्रा बोलेरो या चारचाकी गाडीमधून गोवंश आणि वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्‍याची माहिती मानद प्राणी कल्‍याण अधिकारी अहिरेश्‍वर जगताप यांना मिळाली. त्‍यांनी हे वाहन थांबवण्‍याचा प्रयत्न केला असता गोरक्षक अहिरेश्‍वर जगताप आणि त्‍यांचे बंधू मयुरेश्‍वर जगताप, तसेच संकल्‍प पाटोळे आणि विकास शेंडगे यांच्‍यावर कलानगर येथे कसाई आणि त्यांचे दलाल यांनी घेराव घालून प्राणघातक आक्रमण करत, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

 

कसायांचा जमाव मोठ्या प्रमाणात असल्‍याने गोरक्षकांनी जमावातून निसटून केडगाव पोलीस चौकी येथे जाऊन कसायांच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट केली आहे. या प्रकरणी गोरक्षक मयुरेश्‍वर जगताप यांनी सचिन मेमाणे, योगेश शिंदे, बिल्‍डर कुरेशी आणि एक अज्ञात अशा ४ कसायांच्‍या विरोधात तक्रार केली आहे.

 

“राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्‍या गोवंशियांची हत्‍या, वाहतूक केली जात आहे.

गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत ! यावरून गोतस्‍करीच्‍या समस्‍येची भीषणता किती आहे ? याची कल्‍पना येते. गोवंशहत्‍या प्रतिबंध कायदा करून अनेक वर्षे झाली आहेत, तरी प्रशासनाने दखल घेऊन दौंड परिसरातील गोतस्‍करी आणि अवैध कत्तलखाने यावर त्वरित कारवाई करावी.”

 

-गोरक्षक अहिरेश्वर जगताप

मानद प्राणी कल्याण अधिकारी 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *