क्राईम

तपस्वी, लोकनेता, सच्चा राजकारणी, कै.मा.खासदार हरिश्चंद्र चव्हाण 


तपस्वी, लोकनेता, सच्चा राजकारणी, कै.मा.खासदार हरिश्चंद्र चव्हाण 

 

☝️☝️☝️👌👌👌👌👌👌👌

मराठी संस्कृती जतन करा 

………………………………………………………………………….

 

सुरगाणा तालुक्यातील अत्यंत लहान गावात २५ डिसेंबर १९५१ जन्मलेले परंतु उच्च शिक्षण घेऊन सामाजिक बांधिलकी राखुन राजकीय आयुष्यात पदार्पण झालेले असे आमचे नेते कै.हरिश्चंद्र चव्हाण साहेब यांचा आज वाढदिवस (जयंती) त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन .!!

गावच्या सरपंच पदापासून सुरू झालेली राजकीय कारकीर्द झेड पी, जिल्हा बँक, सभापती, अध्यक्ष,अपक्ष आमदार, आणि तब्बल तीन वेळेस खासदार अशी दमदार राजकीय कारकीर्द लाभलेलं एकमेव व्यक्तिमत्त्व होते.

अत्यंत सामान्य घरातील व्यक्ती तळागाळापर्यंत जाऊन सामाजिक, आर्थिक प्रश्न घेऊन अहोरात्र मेहनत घेऊन पुढे जात राहिले.

एक निगर्वी सच्चा राजकारणी व साधा स्वभाव यामुळे ते सर्वांपर्यंत पोहचले.

अति सामान्य प्रत्येक व्यक्ती सोबत बोलून, प्रसंगी फोनवर बोलून काम केलं त्यामुळे जो चव्हाण यांना भेटायला आला तो कायमच त्यांचा होत होता.

Advertisement

अफाट जनसंपर्क, प्रमाणिक प्रयत्न , सच्चा स्वभाव सहज भेट होणं हे त्यांची बलस्थाने होती. प्रत्येक पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे आपुलकीचे संबंध असत त्यामुळे वैयक्तिक संबंधाने ते परिचित होते.

कुठलाही पक्षातील कार्यकर्ते आले तरी त्यांना ते मदत करत, आणी निवडून आल्यानंतर मी पक्षातित केवळ लोकप्रतिनिधी असेल असं ते सर्वांना सांगत त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्यांच्या कडे हक्काने जात राहिले व काम पण होत असे.

कोणाविषयी कधी पक्षीय निवडणुकीतील आकस न बाळगता शक्य ती सर्व मदत करत असत,

त्यामुळे सामान्य व्यक्तिंच्या पाठिंब्यावर निवडणुकीत सहज विजयी होत.हे त्यांच्या राजकीय आयुष्यात यशाचं गमक होत.

शेतकरी हितासाठी संसदेत कायमच आक्रमक भूमिका घेतली प्रसंगी स्वपक्षाच्या सरकारात पण संघर्षाची भूमिका घेतली आणि कांदा,सोयाबिन, द्राक्ष ,

ह्या विषयावर चर्चा घडवून आणली.व शेतकरी हिताचे निर्णय घेतले.

त्यासाठी नितीन गडकरी,शरद पवार, नरेंद्र मोदीना भेटून शेतकऱ्यांना दिलासा देणारी भूमिका मांडली.

त्यामुळे त्यांचा कार्याचा गौरव सर्व पक्षीय करीत असत.

असा सच्चा राजकारणी, सामान्यांचा नेता, आदिवासी विकासासाठी झटणारा, सर्वदूर मित्रत्व जपणारा, अजात शत्रू, मा.खासदार आणि लोकांच्या मनातील

जनसेवक आहे.

आज २५ डिसेंबर,त्यांची जयंती, त्यांच्या

पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

-कुबेर जाधव

नाशिक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *